गच्चीवरची बाग : लोखंडी जाळी, किचन ट्रे इत्यादी

उपयुक्त भाजीपाला पिकवण्याबरोबर घरात आल्यावर विसाव्याचे ठिकाण म्हणून गच्चीवरची बाग सजवता आली तर दुग्धशर्करायोगच!

गच्ची वा बाल्कनीमध्ये मर्यादित जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचेही आव्हान असते. म्हणूनच व्हर्टकिल फाìमगचा पर्याय अलीकडे लोकप्रिय होऊ लागला आहे. यासाठी बाजारात उपलब्ध असणारी सच्छिद्र जाड तारेची लोखंडी वा प्लास्टिकची जाळी मिळते. या जाळीचा उपयोग करता येतो. ही जाळी एखादी बादली अथवा टबमध्ये तेवढय़ाच आकाराएवढी व ३-४ फूट उंचीची जाळी बसवावी. त्यास आतून हिरव्या रंगाच्या शेडनेटचे किंवा कापडाचे अस्तर द्यावे.

त्यानंतर माती व पोषण भरावे. ठरावीक अंतरावर या जाळीत बियाणे पेरावीत म्हणजे संपूर्ण गोलावर हिरवाई फुलवता येते. या जाळीवरचे व्हर्टकिल गार्डन खुलून दिसते. या जाळीच्या तळाशी असलेल्या बादली अथवा टबमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी भोके पाडावीत. जाळी कलंडणार नाही याची काळजी घ्यावी. हा प्रकार बागेच्या मध्यभागी ठेवल्यास चारही बाजूने प्रकाश मिळतो. जागेचा जास्तीत जास्त वापर आपल्याला पालक, मेथी अशा पालेभाज्या यात मस्त येतात. तसेच या कल्पकतेमुळे बागेचे सौंदर्यही वाढते.


किचन ट्रॉलीचे पसरट ट्रे आता बऱ्यापकी उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यास छानपकी ४ ते ९ इंचाची खोली असते तसेच वरती पसरटपणाही असतो. या ट्रेलासुद्धा हिरव्या शेडनेट कापडाचे किंवा साडीचे आवरण द्यावे. यातही छान भाजीपाला पिकवता येतो. हे ट्रे हाताळण्यास सोपे असतात. याशिवाय नादुरुस्त व बिघडलेल्या बॅटरीची खोकी भंगार बाजारात मिळतात, तीसुद्धा फुलझाडं फुलवण्यासाठी आपण वापरू शकतो. विविध आकारात व रंगात या बॅटऱ्या मिळत असल्यामुळे बागेत त्या उठून दिसतात. लांबलचक व बऱ्यापकी खोल असल्यामुळे यांचा उत्तम वापर चाफा, कन्हेर अशी तुलतेने मोठी फुलझाडे लावण्यासाठी करता येऊ शकतो. प्लॅस्टिक आवरणाच्या या बॅटऱ्या टिकावू असतात, तरी शक्यतो यात भाजीपाला पिकवू नये. या बॅटरीमध्ये शिसाचे प्रमाण असल्यामुळे ते झाडांना व मनुष्याच्या आरोग्यालाही हानीकारक ठरू शकते. या बॅटरी टेरेसवरील िभतीवर एका ओळीत ठेवल्या तरी चालतात. तसेच यास उत्तम प्रतीची साखळी किंवा तार वापरल्यास त्याचा हँगिंग गार्डनसाठी उपयोग करता येतो.

-
sandeep chavan
9850569644

स्रोत

4 comments:

 1. Pl. Give my name this article. ..
  It's written by my self... sandeep chavan 9850569644

  ReplyDelete
  Replies
  1. नमस्कार, ह्या लेखाच्या मूळ स्त्रोताची लिंक शेवटी दिल्यामुळे नाव लिहिले नव्हते परंतू आपण सुचविल्याप्रमाणे लेखाच्या शेवटी नाव आपले नाव देऊन लेक अद्ययावत केला आहे. तसेच ह्या ब्लॉगवर पूर्वीपासूनच आपले संकेतस्थळ गच्चीवरची बाग लिंक उजवीकडे दिलेली आहे.

   Delete
  2. ह्या व्यतिरिक्त Terms of use ह्या लिंक अंतर्गत व्यक्तिगत माझ्या व इतर मान्यवर लेखकांच्या लेखांमधील फरकदेखील स्पष्ट केला आहे.
   http://garden.kanchankarai.com/p/terms-of-use.html

   Delete