निंबोळी अर्क

५ टक्के निंबोळी अर्क तार करण्याची सोपी पद्धत:

उन्हाळ्यात (पावसाच्या सुरुवातीस) निंबोळ्या उपलब्ध असताना त्या जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात व साठवण करावी. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढ्या बारीक कराव्यात. पाच किलो चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबण्याचा चुरा वेगळा भिजत ठेवावा. दुसर्‍या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. त्या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे. वरीलप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा.

निंबोळी अर्क अधिक प्रभावी करण्यासाठी दहा लिटर अर्कामध्ये खालील पदार्थ फवारणीपूर्वी २४ तास अगोदर टाकून भिजवणे : ३-३ तासांच्या अंतराने ढवळत राहणे व वापरण्यापूर्वी फडक्याने गाळून वापरावे.

१. अर्ध्या किलो हिरव्या मिरचीचा बारीक ठेचा
२. २०० ग्रॅम तंबाखू पूड (पाण्यात उकळून थंड करून अर्क काढावा)
३. २५० ग्रॅम गूळ किंवा निरमा पावडर

* १२ ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करा.
* कडक उन्हात फवारणी टाळा.
स्रोत


No comments:

Post a Comment