नाद "बागे"श्री - घरच्याघरी काळे धन कमवा

निसर्गाची जपणूक करण्याची इच्छा असेल तर मार्ग ही अनेक सापडतात. मयूर भावे यांनी पालापाचोळ्या पासून compost खत तयार करायचा मार्ग शोधला. आणि गृहसंकुला मधल्या कचऱ्याचे रुपांतर Black Gold मध्ये केले, हे आपण मागच्या लेखात पहिले!

आज आपण घराच्या ओल्या कचऱ्याचे रुपांतर Black Gold मध्ये कसे करायचे ते पाहू.

भावेंनी घरातला ओल्या कचरा जिरवण्यासाठी बांबूच्या टोपलीचा सोपा पर्याय सुचवला आहे! ह्या टोपलीत थोडे तयार झालेले खत असते ज्यामुळे ती ओला कचरा खाण्यासाठी सज्ज होते. यात एका कुटुंबाचा (३-४ माणसांचा) ओला कचरा जिरवण्याची क्षमता आहे. या टोपलीत रोजचा तयार होणारा कचरा जसे - फळांची साले, चहाचा चोथा, ताटातील खरकटे, निर्माल्य इत्यादी टाकता येते. हा कचरा लवकरच कुजून जिरतो व नवीन कचऱ्यासाठी जागा तयार होते. गरजे प्रमाणे यातील तयार झालेले खत काढून घेता येते. हवे असल्यास याच टोपलीत श्री भावे एक झाड पण लावून देतात.


या टोपलीला पुरेशी भोके असल्याने वासही येत नाही आणि ओला कचरा चांगल्या प्रकारे जिरतो. त्यात नारळाच्या शेंड्या पुरेश्या प्रमाणात टाकल्याने त्यातुन पाणी बाहेर येत नाही. टोपलीतील कीटकांना पुरेसे खाद्य आणि पाणी दिल्याने गांडूळे किंवा किडे बाहेर येत नाहीत. यात लावलेल्या झाडांना पाणी कमी लागते कारण ओल्या कचऱ्यात पाणी असते.

प्लास्टिक टोपली किंवा बादली पेक्षा ही बांबूची टोपली केंव्हाही उत्तमच कारण काही वर्षांनी प्लास्टिकचे तुकडे पडतात.

ही टोपली २ वर्ष तरी नक्की टिकते. नंतर झाडासकट ही टोपली जमिनीत लावू शकतो. भेट म्हणून देण्यासाठी पण हा एक छान पर्याय आहे.

घराच्या घरी उत्कृष्ठ काळे धन मिळवायचे असेल, तर ह्या कचरा खाणाऱ्या टोपलीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता:
संपर्क: मयूर भावे. ८ वूडलँड ड्रीम्स, गांधी भवन जवळ, कोथरूड, पुणे. ३८
दूरध्वनी: मयूर भावे (९८८ १९७ ८४१२) सुजाता भावे (९८८ १५६५ ९७९)

स्रोत

No comments:

Post a Comment