कंपोस्ट

नाडेफ कंपोस्ट

टाकी बांधण्याची पद्धत:
पाणी न साचणारी उंच ठिकाणाची व सावली असणारी जागा निवडावी. टाकीचे बांधकाम शक्यतो भाजक्या विटांमध्ये ९ इंच जाडीचे करावे. टाकीचा आकार १५ फूट लांब, ५ फूट रुंद व ३.५ फूट उंच असावा. बांधकाम करताना टाकीचा तळाचा भाग कठीण स्वरूपाचा करून घ्यावा. वीट बांधकामाच्या प्रत्येक थरानंतर तिसर्‍या थरामध्ये खिडक्या ठेवा. खिडक्यांची रचना तिरकस रेषेत चारी बाजूंना येईल असे पहावे.
नाडेफ भरण्यासाठी लागणारी सामग्री : –
१) १५ टन काडी कचरा, पालापाचोळा, घसकटे इ.
२) ८ ते १० पाट्या शेणखत व १ गाडी माती.
३) ४ ते ५ बॅटल पाणी.
४) जनावराचे मूत्र उपलब्धतेनुसार.

नाडेफ भराई पहिला थर:

तळाला १५ ते ८० सेंमी जाडीचा काडी कचरा, पालापाचोळा, धसकटे इत्यादी घेऊन त्यावर शेणकाला शिंपडावा. त्यावर साधारण ५ ते ६ घमेली माती पसरून टाकावी. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन नाडेफ बांधकामाच्या वर १.५ फुटापर्यंत भरून घ्यावा. त्यावर माती व शेणाच्या मिश्रणाचा लेप देऊन लिपून घ्यावे.

काही दिवसांनंतर नाडेफमधील सामग्रीखाली दबलेली आढळते. अशा प्रसंगी पुन्हा वरीलप्रमाणे एकावर एक थर देऊन माती व शेणाच्या मिश्रणाचा थर देऊन घ्यावे.

******************************************************

बायो-डायनॅमिक कंपोस्ट:

बायो-डायनॅमिक कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य लागते.

१) एस – ९ कल्चर २) शेतातील काडीकचरा ३) कापसाच्या काड्या ४) शेतीतील तण ५) कडूनिंबाच्या झाडाची पाने ६) निरगुडीची पाने ७) मोगली एरंडाची पाने ८) गाजर गवत ९) गिरीपुष्प १०) बेशटम ११) ताजे शेण ८ ते १० दिवसांचे १२) १५०० ते २००० लिटर पाणी

एक टन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १५ फूट लांब, ०५ रुंद जागा लागते व या जागेत ३ ते ४ फूट उंच ढीग लावून खत तयार करतात. ढिगांची दिशा पूर्व-पश्‍चिम असावयास हवी. ढिग लावताना १५ बाय ५ फूट जागा स्वच्छ करून त्यावर हलका पाण्याचा सडा टाकावा. वरीलप्रमाणे जमा केलेल्या ओल्या व सुक्या काडीकचर्‍यावर पाणी टाकून चांगले भिजवावे. त्यानंतर पहिला १ फुटाचा काडीकचर्‍याचा थर द्यावा. त्यावर पाणी टाकावे. दुसर्‍या ८ ते ३ इंच जाडीच्या थरावर शेणकाला शिंपडावा १ किलो एस-९ कल्चर १०० लिटर पाण्यात टाकून थोडा वेळ चांगले ढवळावे व हे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात सोडावे. त्यानंतर १ फुटापर्यंत जैविक पदार्थ व ओले शेण यांचा थर लावावा. प्रत्येक थरावर एस-९ कल्चरचे द्रावण शिंपडावे. अशा प्रकारे ३ ते ४ फूट उंच डेपो तयार करावा. शेणमातीने लिंपून घ्यावा. एक महिन्यानंतर डेपोला पलटी द्यावी अशाप्रकारे आठ महिन्यात उत्तम कंपोस्ट तयार होते.

स्रोत

No comments:

Post a Comment