कढीपत्ता लागवड

कढीपत्ता वा कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. संस्कृतमध्ये कृष्णिनब तसेच कैटर्य, हिंदीमध्ये मीठानीम, इंग्रजीमध्ये करी लिव्हज, तर शास्त्रीय भाषेत मुर्रया कोएनिगी या नावांनी ओळखला जाणारा कढीपत्ता किंवा गोडिलब हा रुटेसी कुळातील आहे.

कढीपत्त्याचे झाड मध्यम आकाराचे असते. हे झाड प्रत्येकाच्या परसबागेत लावणे आवश्यक आहे. कारण याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे घराजवळील वातावरण स्वच्छ, सुगंधी राहण्यास मदत होते. तसेच वातावरणातील जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो व आजार आपल्यापासून दूर राहतात. याच्या पानांमधून सुगंधी तेलही निघते.

औषधी गुणधर्म:
कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच जीवनसत्त्व अ, ब-१, ब- २ व क जीवनसत्त्वही असते. त्यामुळे कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनाने हे सर्व गुणधर्म शरीराला मिळतात व त्यातूनच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आयुर्वेदानुसार कढीपत्ता हा दीपक, पाचक, कृमिघ्न व आमांशयासाठी पोषक असतो.

सावधानता:
कढीपत्त्याची पाने स्वयंपाकात वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावीत. अनेक जण पोह्य़ामधील, आमटी, कढी अशा आहारातील पदार्थामधील कढीपत्ता वेचून बाहेर काढून टाकतात. उलट तो कढीपत्ता बारीक कुस्करून आहारीय पदार्थाबरोबर खाऊन टाकावा किंवा गृहिणीने कढीपत्त्याचे बारीक बारीक तुकडे करूनच ते पदार्थात वापरावेत म्हणजे खाल्ले जातील.


कढीपत्त्याचे रोप एक वर्षांचे झाल्यावर त्याच्या खालच्या बाजूची पाने काढण्यास तयार होतात. सुरुवातीस पाने कमी काढावी. पाने काढल्यावर रोपाची वाढ जोमाने होते. दोन महिन्यांतून एकदा कुंडीमध्ये थोडे शेणखत टाकावे. पाणी मोजकेच द्यावे. जेवढे पाणी कमी तेवढा पानांना सुवास जास्त असतो. कढीपत्त्यावर केव्हातरी अचानकपणे एखाद्या हिरव्या अळीचे आगमन होते आणि रात्रीतून सर्व पाने गायब होऊन फक्त काडय़ा शिल्लक राहतात. अळीचा रंग हिरवा असल्यामुळे तिला ओळखणे आणि शोधणे कठीण होते, मात्र असाध्य नाही. अळी काढून टाकल्यावर कुंडीमध्ये खत घालून पाणी द्यावे. कढीपत्ता पुन्हा छान फुटतो. कीटकनाशक मात्र मारू नये.

परसबागेत अथवा फ्लॅटमधील कुंडीतील कढीपत्ता असो, नाही तर शेतातील कढीपत्त्याचे झाड असो इतर बऱ्याच पिकांहून वाढीचेबाबतीत मंदगतीचे हे झाड आहे. तेव्हा त्याची वाढ व्हावी, यासाठी काही लोक आंबट टाक महिन्यातून एकदा १ लि. ताकात ५ लिटर पाणी मिसळून साधारण प्रत्येक झाडास १०० ते २०० मिली द्रावण ओततात. पण मोठ्या क्षेत्रावर हे व्यवहार्य नाही. त्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोनच्या वरीलप्रमाणे फवारण्या ह्या वाढीसाठी व स्वाद व हरितद्रव्याचे प्रमाण तसेच कढीपत्त्याची काढणी केल्यावर नवीन फूट व पल्लेदार फांद्या निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात असा अनुभव आहे.

तणापासून संरक्षण: कढीपत्त्यावर फिक्कट हिरव्या बदामी आकाराच्या पानांच्या वेलवर्गीय तणाचा प्रादुर्भाव होतो. ह्या वेळचे आगारे कढीपत्त्याच्या कोवळ्या फुटीला वेढा मारतात. परिणामी कढीपत्त्याचे झाड हतबल होऊन वाढ खुंटते. तेव्हा आगरे निघण्यापुर्वी अशी तणे उपटून काढावीत.

खत पाणी: सुगंधा कढीपत्त्यास साधारणत: एक महिन्याने थोडेसे (२५ ते ५० ग्रॅम) मिश्रखत आळे करून द्यावे. फोकून पेरलेल्या कढीपत्त्यास सर्वसाधारणपणे खुरपून झाल्यावर पालची वाढावी म्हणून कल्पतरू सेंद्रिय खत झाडाभोवती गोलाकार गाडून पाणी दिल्यास जमीन भुसभुशीत होऊन फुटवे व पालवी भरदार व हिरवी निघेल. पाण्याची पाळी महिन्यातून एकदा दिली तरी चालते. रान हलके असल्यास महिन्यातून २ वेळा पाणी द्यावे.

निसर्गशेतातील शेतकऱ्यांनी सरीतील गवत कापून त्याचे अंथरूण (मल्चिंग) करावे व सप्तामृताची फवारणी वर्षातून ३ ते ४ वेळा करावी. म्हणजे कढीपत्त्याची वाढ अतिशय चागंली होत असल्याचे आढळून आले आहे.

कढीपत्त्यावरील काळे डाग:
1) 3.79 लिटर पाणी + 1 चमचा बेकिंग सोडा + 2.5 चमचे वनस्पति तेल + 1 चमचा Liquid soap
(अंघोळीची साबण वापरू नका).
जिथे काळे डाग आहेत तिथे फवारणी करा.
2) Neem oil ने दोन आठवड्यातून एकदा फवारणी करा.
3) 1 भाग Dairy milk आणि 2 भाग पाणी आठवड्यातून एकदा फवारणी करा.

स्रोत, स्रोत, स्रोत

No comments:

Post a Comment