नाद "बागे"श्री - पानगळ

मागच्या लेखामध्ये आपण मयूर भावे यांच्या बागेची माहिती घेतली. ते व त्यांचं कुटुंब आपला बागेचा छंद जोपासताना निसर्गाचा समतोल राखला जाईल याची पुरेपूर काळजी घेतं.

आजकाल गृहसंकुलांमध्ये "पालापाचोळा" ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आवारात सिमेंट / concrete अथवा फरशा घातल्यामुळे पाने मातीत पडून कुजायला वाव मिळत नाही. बहुतांशी पाला पाचोळा जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण वाढते. यावर भावेंनी एक तोडगा काढला आहे. तो म्हणजे लोखंडी पिंजरा!

या पिंजऱ्यात वरून पाने व पालापाचोळा व रोज थोडे पाणी टाकायचे. निम्मी जाळी सेंद्रिय कचऱ्याने भरावी जसे - सुकलेली पाने, गवत व ओला कचरा. शिळे अन्न मात्र टाकू नये. महिन्यातून एकदा कंपोस्टिंग कल्चर टाकायचे. या पद्धतीने पहिल्यांदा सुमारे ३ महिन्यांनी खत तयार होते. हे खत जाळीच्या खालच्या बाजूला असलेले दार उघडून काढून घेता येते. पुढे दर १५ दिवसांनी खत मिळत राहते.


लोखंडी जाळी नको असेल तर पर्यावरणपूरक बांबूची जाळी पण त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. जाळीचा खालचा भाग मातीच्या संपर्कात येऊन कुजू नये म्हणून ती विटांच्या चवथऱ्यावर किंवा फरशी वर ठेवणे आवश्यक आहे. पाणी घालतांना बाहेरच्या बाजूचे बांबू भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.


मोठ्या रहिवासी संकुलांसाठी हा पिंजरा अतिशय उपयोगी ठरतो.

आपल्या सोसायटी मध्ये सुकलेल्या पानांची समस्या असेल, तर ह्या Leaf Composter साठी खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता:
संपर्क: मयूर भावे. ८ वूडलँड ड्रीम्स, गांधी भवन जवळ, कोथरूड, पुणे. ३८
दूरध्वनी: मयूर भावे (९८८ १९७ ८४१२) सुजाता भावे (९८८ १५६५ ९७९)

स्रोत

No comments:

Post a Comment