हिरवळीची खते

दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खताची उपलब्धता व पर्यायाने जमीनीची सुपीकता कमी होत चालली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी हिरवळीची पिके घेऊन फुलोर्‍यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळून जमिनीचा पोत सुधारतो व सुपीकता वाढते.

जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास सेंद्रिय कर्बाची अत्यंत आवश्यकता असते; परंतु भारत हा उष्ण प्रदेश असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे ऑक्सिटेशन खूप झपाट्याने होते व सेंद्रिय कर्बाची नेहमीच कमतरता भासते.
सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जमिनीत वाढल्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या जिवाणूंची संख्या खूप वाढते. तसेच सेंद्रिय पदार्थ मातीच्या लहान लहान कणांना एकत्र सांधून ठेवतो. हलक्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

सेंद्रिय पदार्थ जेव्हा सनिल अवस्थेत (अ‍ॅटोबीळ) कुजतो तेव्हा त्यांच्यातील मूलद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. शिवाय कुजताना काही रासायनिक बदल होऊन अनुपलब्ध असलेली मूलद्रव्ये उपलब्ध होतात.

हिरवळीच्या खतासाठी प्रमुख पिके:
मुळावर गाठी असणारी दालवर्गीय (बोरू, बैंचा, मूग, उडीद, मटकी, गवार, चवळी इ.) आणि गाठी नसलेली (ज्वारी, मका, सूर्यफूल) अशा दोन्ही प्रकारची पिके हिरवळीच्या खतासाठी वापरतात. या दोन पिकांमधील प्रमुख फरक म्हणजे मुळावर गाठी असलेल्या पिकाद्वारे नत्र आणि सेंद्रिय पदार्थ जमिनीत घातले जातात, तर गाठी नसलेल्यांमधून फक्त सेंद्रिय पदार्थच जमिनीत घातला जातो. हिरवळीचे पीक ५०% फुलोर्‍यावर असताना (४० ते ५० दिवसांनंतर) जमिनीत गाडावे. हिरवळीचे खताचे पिका गाडणे व दुसरे पीक पेटणे यामधील कालावधी फार महत्त्वाचा आहे. सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे व्यवस्थित कुजून नत्राचे रूपांतर नायट्रेटमध्ये झाल्यानंतरच दुसर्‍या पिकाचे पेरणी करणे योग्य ठरते. (साधारणपणे ८ आठवड्यांनंतर)

स्रोत

No comments:

Post a Comment