बीजामृत व जीवामृत

बीजामृत

बीजामृताच्या बीजप्रक्रियेमुळे उगवणशक्ती वाढते तसेच तुटवातीची वाढ जोमदार होते.

साहित्य: २० लिटर पाणी, १ किलो देशी गाईचे शेण, १ लिटर गोमूत्र, १०० मिली दूध, जिवाणू माती मूठभर व ५० ग्रॅम चुना.

अमृत पाणी:
साहित्य: पावशेर देशी गाईचे तूप, १० किलो शेण, अर्धा किलो मध, २०० लिटर पाणी.१० किलो शेणामध्ये पावशेर तूप व अर्धा किलो मध मिसळून हे मिश्रण २०० लिटर पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्यावे. जमिन वाफशावर असताना जमिनीवर शिंपडावे किंवा पाटाच्या पाण्यातून योग्य प्रमाणात सोडावे.

******************************************************

जीवामृत:

साहित्य: १० किलो देशी गाईचे शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो जुना काळा गूळ, २ किलो कडधान्याचे पीठ, ज्या शेतामध्ये वापरावयाचे आहे त्या शेतामधील १ किलो माती, २०० लिटर पाणी. वरील सर्व साहित्य २०० लिटर प्लास्टिक पिंपामध्ये भिजत ठेवावे. चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण २ ते ७ दिवस आंबवावे. दरम्यानच्या काळात सकाळी, दुपारी व संध्याकाळी द्रावण ढवळावे. जमीन वाफशावर असताना जमिनीवर शिंपडावे किंवा पाटाच्या पाण्यातून योग्य प्रमाणात (वरील द्रावण एक एकरासाठी) सोडावे.

– बिभीषण बागल
(लेखक कृषी तज्ज्ञ असून ‘इस्राएलमधील शेती’ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे.)
संपर्क : ९९२३८०९३९२
bhibhishanbagal@gmail.com

स्रोत

No comments:

Post a Comment