सपुष्प वनस्पतींमधील विवाह संस्था

वनस्पती अचल असतात. प्राणी मात्र चल म्हणजे फिरू शकणारे असल्याने आपला जोडीदार किंवा जोडीदारीण स्वत: शोधू शकतात व त्यांचे मीलन होते. त्यामुळे निसर्गाने वनस्पतिंमध्ये मीलन घडवून आणण्यासाठी अनेक आश्चर्यजनक योजना केल्या आहेत.

वनस्पतींमध्ये शुक्रनिर्मिती फुलांच्या पुंकेसरांत तर स्त्रीबीजनिर्मिती स्त्रीकेसरात होते. उभयिलगी फुलांमध्ये पुंकेसर तसेच स्त्रीकेसर असतात. तर काही फुलांत केवळ पुंकेसर असलेली नरपुष्पे असतात किंवा केवळ स्त्रीकेसर असलेली स्त्रीपुष्पे असतात.

निसर्ग परागकण विविध प्रकारे व वेगवेगळ्या दूतांमार्फत स्त्रीकेसरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. परागकण स्त्रीकेसरात रुजल्यावर त्यातील शुक्राणूंचा स्त्रीबीजाशी संयोग होतो व बीजधारणा होते. अशा रीतीने वनस्पतींमधील विवाह सोहळा संपन्न होतो.

कित्येक उभयिलगी फुलांमध्ये जरी स्वत:च्याच परागकणांमुळे स्त्रीकेसराचे परागीभवन होत असले तरी निसर्ग अशा प्रकारचे सगोत्र विवाह टळण्यासाठी अनेक क्लृप्त्या योजताना दिसतो.
बटाटा, तंबाखू काही ऑर्किड्स आणि चहाच्या फुलांमध्ये स्वपरागीकरण झाले तरी बीजनिर्मिती होत नाही. जास्वंद, कोथिंबीर आणि सूर्यफूल यांच्या कुलातील फुलांचे स्त्री व पुरुष अवयव भिन्न वेळांना वयात येते असल्याने त्यांच्यात स्वपरागीभवन होऊ शकत नाही.


भिन्न फुलांमध्ये परागीकरण घडावे म्हणून निसर्ग विविध योजना करतो. यासाठी त्याला विशेष दूतांकरवी परागकण एका फुलाकडून दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचवावे लागतात. हे दूत असतात वारा, पाणी किंवा विविध प्राणी ज्यांत कीटकांपासून ते गोगलगाय, पक्षी व वाघळांचा समावेश होतो. अगदी मनुष्यप्राणीही याला अपवाद नाही तोदेखील जाणता-अजाणता परागवहनाचे काम करतो.

वायुदूताने परागीभवन होणारी फुले लहानखुरी, अतिसामान्य रूपाची तसेच रंगहीन, गंधहीन व पुष्परस नसलेली अशी असून मोठय़ा प्रमाणात धूलिकणांसारख्या परागकणांची निर्मिती करतात. मका, गहू यांसारखी तृणधान्ये ओक, बीच, वोलो असे वृक्ष यांचे परागीभवन वाऱ्यामार्फत होते. पाईनवृक्षांच्या जंगलात पिवळ्या रंगाचे परागकण मोठय़ा प्रमाणात बाहेर पडतात. त्यांच्या अशा ढगांना ‘सल्फर शॉवर’ असे नाव दिले गेले आहे.

स्रोत

No comments:

Post a Comment