आंब्याला वाचवू या

आंबा पिकाखाली देशातील एकूण फळझाडांखालील क्षेत्राच्या ४२ टक्के क्षेत्र असून त्यापासून ९० लाख टन इतके उत्पादन मिळते. आंबा फळाची मधुरता आणि उपयुक्तता यामुळे आंब्याला ‘फळांचा राजा’ असे म्हणतात. मात्र या आंब्यावर जवळपास ६० प्रकारच्या वेगवेगळय़ा रोगांनी आक्रमण केले आहे. यातील भुरी आणि करपा हे अत्यंत महत्त्वाचे रोग आहेत. यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आंबा लागवडीचे सर्वात जास्त क्षेत्र उत्तर प्रदेशात असून उत्पादकतेच्या बाबतीत आंध्र प्रदेशाचा प्रथम क्र मांक लागतो. भारतापासून होणा-या एकूण फळांपासून विविध पदार्थ बनवता येतात. देशात आंबा आणि त्यापासूनच्या पदार्थ निर्मितीला भरपूर वाव आहे.

महाराष्ट्रात जवळजवळ सर्व जिल्ह्यांत आंब्याची लागवड होते. कोकण विभागात सर्वात जास्त क्षेत्र लागवडीखाली असून त्याखालोखालप्पश्चिम महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. संपूर्ण देशाचा विचार केल्यास महाराष्ट्रातील आंब्याचा हंगाम उत्तर आणि दक्षिण भारतातील हंगामाच्या मध्यावर येतो, त्यामुळे अधिक फायदा मिळू शकतो. राज्यात विभागपरत्वे निवडक जाती वाढवून तसेच पिकापासून मिळणारे आर्थिक फायदे ओळखून आंब्याखालील क्षेत्र वाढवणे आवश्यक आहे आणि त्यास भरपूर वावही आहे. महाराष्ट्र सरकारच्या फलोद्यान कार्यक्रमातही आंब्याला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. आंब्याचा उल्लेख वनस्पतीशास्त्रज्ञांनी १६०५ पासून केलेला आहे.


लखनौ येथील बिरबल साहनी इन्स्टिटय़ूट ऑफ पॅलेबॉटनी संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. मेहरोत्रा यांनी संशोधन करून आंब्याचे मूळ स्थान ईशान्य भारतातील मेघालयाच्या दामलगिरी टेकडय़ांजवळ आहे. आंब्याचा उगम सुमारे साडेसहा कोटी वर्षापूर्वीचा आहे. आर्थिक आणि अन्नद्रव्य मूल्यांच्या दृष्टीने आंबा हे सर्वाच्या आवडीचे फळ असून त्याच्या विविध उपयोगांमुळे आणि गुणधर्मामुळे या पिकास महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याच्या दृष्टीने आंबा हे फळ सवरेत्तम मानले जाते.

आंब्याच्या फळाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत-गोटीएवढय़ा आकाराच्या फळापासून ते पूर्ण पोसलेल्या पक्व अवस्थेपर्यंतच्या फळापासून विविध खाद्यपदार्थ तयार करता येतात. कै-या, चटणी, कढी, पन्हे, मुरंबा, लोणची यासाठी तसेच पूर्ण पिकलेले फळ खाण्यासाठी, फळाच्या फोडी व रस हवाबंद डब्यात भरण्यासाठी, जॅम, सरबत, टॉफी, आमरस पोळी आंबावडी इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. कोयीच्या आतल्या दलावर रासायनिक प्रक्रिया करून अन्नपदार्थाची निर्मिती करता येते. तसेच कापडास खळ देण्यासाठी स्टार्च तयार करता येतो. आंब्याच्या लाकडाच खोकी, दरवाजे, फळय़ा इत्यादी तयार करण्यासाठी तसेच सरपण्यासाठी उपयोग करतात.

भारतातून दरवर्षी सरासरी सुमारे १२,००० टन आंबाफ ळांची निर्यात होते. जगातील ५३ देशांमध्ये भारतातून आंबाफळे निर्यात केली जातात. त्यापैकी ९५ टक्के आंबाफळे ही बहारीन, बांगलादेश, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, युनायटेड अरब अमिरात या देशांत निर्यात केली जातात. भारतात होणा-या एकूण फळे आणि फळांपासून तयार होणा-या प्रक्रियायुक्त पदार्थाच्या निर्यातीत फ क्त आंब्याचा वाटा ६० टक्के आहे.

पिकलेला आंबा हा उत्साहवर्धक, शरीरवर्धक आणि आहारदृष्टय़ा पौष्टिक मानला जातो. आंब्यात अ, ब, क जीवनसत्त्वे तसेच खनिजे आणि साखर भरपूर प्रमाणात असते. महाराष्ट्रातील आंब्याच्या फळांचा हंगाम चालू असतो, त्या वेळी उत्तर आणि दक्षिण भारतातील आंबाफ ळे बाजारात जास्त प्रमाणात नसतात. यामुळे स्थानिक तसेच दूरवरच्या बाजारातही आपल्या आंब्याला भाव चांगला असतो. आंबाफळे आणि त्यापासून तयार होणा-या उत्पादनांची परदेशातील मागणी, देशांतर्गत मागणी आणि भाव, लाकडाची उत्पादकता पाहता आंबा लागवडीला महाराष्ट्रात भरपूर वाव आहे. क्षेत्रफळाचा विचार केल्यास महाराष्ट्राचा क्रमांक दहावा लागतो. तसेच उत्पादकतेच्या बाबतीत आठवा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वात जिल्ह्यांत आंब्याची लागवड आढळते. रायवळ आंब्याचे उत्पादनक्षम आयुष्य ८० ते १०० वर्षे तर कलमी आंब्याचे उत्पादनक्षम विचारल्यास त्यावर अनेक प्रकारचे रोग आढळून येतात. त्याची काळजी योग्य त्या वेळी न घेतल्यास आंबा बागायतदारांना मोठय़ा नुकसनीला सामोरे जावे लागेल. हे नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचे रोग व त्याचे नियंत्रण याची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

आंब्यावरील रोग आणि त्याचे नियंत्रण:

करपा: हा रोग प्रामुख्याने पावसाळय़ात नवीन पालवी येण्याच्या वेळी दिसून येतो. हवा बुरशीजन्य रोग असून त्यामुळे पानावर व खोडावर अनियमित आकाराचे खोलगट तांबूस ठिपके तयार होतात. पुढे हे ठिपके मोठे होतात व एकमेकांत मिसळतात. त्यामुळे पाने करपतात व नंतर गळतात. आंब्याच्या रोपाप्रमाणेच मोठय़ा झाडाच्या पानांवर, फांद्यांवर, मोहोरावर आणि फळांवर हा रोग आढळून येतो. तापमान २४ ते २८ अंश सेल्सिअस, सापेक्ष आद्र्रता ९० टक्के पेक्षा जास्त आणि वा-याचा वेग दर तासाला ९ किलोमीटरपेक्षा असल्यास हा रोग जलद पसरतो.
उपाय: या रोगाच्या नियंत्रणासाठी बागेत स्वच्छता राखावी, रोगट फांद्या कापून काढाव्यात आणि गळून पडलेल्या रोगट पानांचा नाश करावा. तसेच पुढील उपाययोजना करावी.
रोपाच्या व कोवळय़ा कलमांच्या पानांवरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पानांवर १ टक्के बोर्डो मिश्रण (१०० ग्रॅम मोरचूद+१०० ग्रॅम चुना +१० लिटर पाणी) किंवा १०० ग्रॅम ब्लायटॉक्स पावडर (५०टक्के द्राव्य) १० लिटर पाण्यात मिसळून रोगाची लक्षणे दिसताच फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने चार वेळा फवारणी करावी.
फळे तोडण्यापूर्वी आणि फळे तोडल्यानंतर या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी ४० ग्रॅम बाविस्टीने (५० टक्के द्राव्य) किंवा कॅप्टन (५० टक्के द्राव्य) पावडर १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी आणि तोडलेली फळे वरील बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून काढावीत.

भुरी रोग: आंब्याच्या मोहोरावरील हा सर्वात जास्त प्रमाणात नुकसान करणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामध्ये मोहोर काळा पडून जातो. हा रोग आंब्याला मोहोर येण्याच्या वेळी जास्त पसरतो. या रोगामुळे मोहोर, कळय़ा, देठ, फुले आणि लहान फळांवर बुरशीची वाढ होते व या भागाची मोठय़ा प्रमाणात गळ होते. भुरी रोगाचा प्रसार मुख्यत: तुडतुडय़ांमुळे तसेच काही प्रमाणात वा-यामुळे होतो.
उपाय: या रोगाच्या नियंत्रणासाठी पूर्वी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपाययोजना करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी २० ग्रॅम बाविस्टीन पावडर (५० टक्के द्राव्य) किंवा २७ ग्रॅम मायक्रोसुल पावडर (७० ते ८ टक्के द्राव्य) किंवा २५ ग्रॅम कॅराथेन (४० टक्के द्राव्य) १० लीटर पाण्यात मिसळून आंब्याच्या मोहोरावर तसेच फळावर फवारणी करावी. हा रोग पसरवणा-या तुडतुडय़ांचे वेळीच नियंत्रण दिसून येतो.

स्रोत

No comments:

Post a Comment