नैसर्गिक आरोग्य गुटी!

पावसाळ्याच्या दिवसांत बाजारात फेरफटका मारल्यास आपल्याला विविध रंगांच्या, प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. डोंगरउतारावर, नदी किना-यावर, ओढा-विहीर तसंच नदीपरिसरांत, रानवाटांवर, कधी कधी शेताच्या बांधावर तर कधी घरामागच्या परसात या भाज्या आपसुकच उगवतात, तेही रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या वापराशिवाय. आजच्या ‘फास्टफूड-जंकफूड’ खाणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढणा-या जमान्यात ‘पौष्टिक खा, निरोगी राहा’असं वारंवार सांगितलं जातं. अशा वेळी या रानभाज्या प्रत्येकासाठी ‘हेल्थ टॉनिक’च ठरत आहेत.

पावसाळ्यात धरती हिरव्या रंगाने उजळून जाते’ किंवा ‘पावसातला धरतीचा हिरवा रंग पाहून जणू ती हिरवाकंच शालूच नेसली आहे, असं वाटतं’ यांसारख्या उपमा आजपर्यंत अनेकदा निबंध, ललित निबंध, गोष्टी, व्याख्यानं, कविता यांतून अनेकदा कानावर पडल्या असतीलच; पण एका अर्थी पाऊस आणि हिरवा रंग यांचं नातं सांगणा-या लालित्यपूर्ण उपमा तंतोतंत ख-या आहेत. पावसाळय़ात निसर्गाची विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात. या रूपांपैकीच एक म्हणजे हिरव्या रंगाच्या विविध छटा असणा-या रानभाज्या. (क्वचितच एखाद् दुसरी भाजी लाल, शेंदरी नाही तर तपकिरी रंगाची असते) .

या रानभाज्यांचं वैशिष्टयं म्हणजे त्या रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या वापराशिवाय आपोआप उगवतात. त्यामुळे त्या भाज्यांमधील पौष्टिक गुणधर्मात दुपटीने वाढ होते. परिणामी या रानभाज्या विविध आजारांवर, विकारांवर गुणकारी ठरतात. या पावसाच्या दिवसात पोकळा, केनी, मायाळू, मोहाची फुलं, राजगिरा, आपटयाच्या पानांसारखी पण मऊ लुसलुशीत कोरलाची पानं, गवताप्रमाणे दिसणारी फोडशी, चिंचेच्या पानांप्रमाणे दिसणारा कोवळय़ा पानांचा खुरासन, तेलपट, शेवळी, रानटी माठ, लोत, तोरणा, कोरळ, नारणवेल, घालवेल, धोरता, कुंडा, दिंडा, रानटोण, पेंढरा, मांड, रानमाठ, काटेमाठ, हिरवामाठ यांसारख्या भाज्या भरपूर प्रमाणात खाण्याचा हा महत्त्वाचा ऋतू आहे.

या भाज्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या रासायनिक खतविरहित असल्यामुळे उपवासालाही खाता येतात. मांसाहारी मंडळी या भाज्यांमध्ये ओली किंवा सुकी कोळंबी, तिसरे, सुके बोंबील टाकूनही या भाज्या बनवतात. रानभाज्यांमध्ये असणा-या तंतुमय (फायबर) घटकांमुळे पावसात मंदावलेली पचनक्रिया अधिक गतिमान होते.

‘हेल्थ टॉनिक’ किंवा ‘आरोग्यासाठी गुटी’ ठरलेल्या अशा महत्त्वाच्या रानभाज्यांची ही ओळख: