कढीपत्ता लागवड

कढीपत्ता वा कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. संस्कृतमध्ये कृष्णिनब तसेच कैटर्य, हिंदीमध्ये मीठानीम, इंग्रजीमध्ये करी लिव्हज, तर शास्त्रीय भाषेत मुर्रया कोएनिगी या नावांनी ओळखला जाणारा कढीपत्ता किंवा गोडिलब हा रुटेसी कुळातील आहे.

कढीपत्त्याचे झाड मध्यम आकाराचे असते. हे झाड प्रत्येकाच्या परसबागेत लावणे आवश्यक आहे. कारण याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे घराजवळील वातावरण स्वच्छ, सुगंधी राहण्यास मदत होते. तसेच वातावरणातील जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो व आजार आपल्यापासून दूर राहतात. याच्या पानांमधून सुगंधी तेलही निघते.

औषधी गुणधर्म:
कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच जीवनसत्त्व अ, ब-१, ब- २ व क जीवनसत्त्वही असते. त्यामुळे कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनाने हे सर्व गुणधर्म शरीराला मिळतात व त्यातूनच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आयुर्वेदानुसार कढीपत्ता हा दीपक, पाचक, कृमिघ्न व आमांशयासाठी पोषक असतो.

‘मातीविना शेती’तून पशुखाद्यनिर्मिती!

महाराष्ट्राच्या अनेक भागांत दुष्काळ व अवकाळी पाऊस पाचवीला पूजलेला. दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या काढण्याच्या घोषणा होत असल्या तरी चाऱ्याअभावी जनावरांच्या होणाऱ्या हालाला पारावर नसतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कमीत कमी पाणी आणि ‘मातीविना शेती’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नगदी पिके घेण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आणि ८२ टक्के कोरडवाहू शेती यामुळे चारा पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी विभागाने ‘हायड्रोपोनिक’ तंत्राद्वारे हिरव्या चाऱ्याच्या निर्मितीची योजना तयार केली आहे. या चारानिर्मितीसाठी जागा कमी लागते तसेच कमीत कमी पाण्याचा वापर करून सातत्याने चारा उत्पादन घेता येते. या चाऱ्यात जास्त प्रोटिन तर असतेच शिवाय उत्पादनही जास्त प्रमाणात होते. सामान्यपणे चारा तयार होण्यास ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो तर हायड्रोपोनिक तंत्राद्वारे सात दिवसांत चाऱ्याची निर्मिती करता येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीशिवाय याचे उत्पादन करता येत असून केवळ ५० चौरस मीटर क्षेत्रात चारानिर्मिती करता येते.

अ‍ॅक्वापोनिक्स : एक अफलातून लघुउद्योग

मत्स्य-जल-भाजीपाला चक्रीउद्योग म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या आधारे सुरू करता येणारा, सध्याच्या महागाईच्या भडक्याला आटोक्यात ठेवण्यास उपयुक्त ठरावा असा एक पर्यावरणपूरक लघुउद्योग आहे. ‘अ‍ॅक्वापोनिक्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जोडधंद्याच्या विकासाला शासनाने पद्धतशीरपणे चालना देणे आवश्यक ठरते. संतुलित आहारपोषणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा या उद्योगाला इंग्रजी भाषेमध्ये अ‍ॅक्वापोनिक्स, असे संबोधले जाते. अ‍ॅक्वापोनिक्स हा शब्द अ‍ॅक्वाकल्चर आणि हायड्रोपोनिक्स या दोन अर्थपूर्ण शब्दांच्या संयोगाने बनलेला शब्द आहे.

या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी प्रथम अ‍ॅक्वाकल्चर आणि हायड्रोपोनिक्स या दोहोंचा अर्थ माहीत करून घेणे आवश्यक आहे. अ‍ॅक्वाकल्चर म्हणजे विशेषत: गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेती ज्यामध्ये मेजर कार्प, रोहू किंवा म्रिगल या प्रकाराच्या गोडय़ा पाण्यात वाढणाऱ्या माशांची किफायतशीरपणे पैदास केली जाते. आता हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ते पाहू. मातीशिवाय केवळ पाण्यातून दिलेल्या पोषणद्रव्यातून भाजीपाला, भेंडी, वांगी टोमॅटो यांसारखी वनस्पती उत्पादने भरभरून काढणे.

पाण्यात विरघळवून खते वापरा

मातीशिवाय शेती या संबंधात जिज्ञासा जागृत करणे हा लेखाचा उद्देश होता. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ फक्त वाचन न करता काही अगदी सोपे प्रयोग स्वत करून पाहण्याची इच्छा होईल अशी अपेक्षा आहे.

मातीशिवाय शेती करताना पाण्यामध्ये पोषकद्रव्ये कोणती व किती प्रमाणात घालावयाची याची विचारणा काहींनी केलेली आहे. वनस्पती आपले अन्न हवा, पाणी व सूर्यप्रकाश याच्या साहाय्याने स्वत तयार करतात. त्यातील प्रमुख घटक कर्ब,(कार्बन), प्राणवायू (ऑक्सिजन), व हायड्रोजन त्यांना पाण्यातून व हवेतून मिळतो. त्यामुळे ते वेगळे पुरवण्याची गरज नसते. इतर घटक द्रव्ये म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅलशियम,मॅग्नेशियम व सल्फर आवश्यकतेप्रमाणे द्यावी लागतात. त्याशिवाय बोरॉन, तांबे, लोह, जस्त,मँगेनीज इत्यादी सूक्ष्म प्रमाणात लागतात. यातील प्रत्येकाचे प्रमाण हे कुठली वनस्पती आहे, यावर अवलंबून आहे. परंतु आपल्या प्रयोगासाठी फार सोपा मार्ग उपलब्ध आहे.

मातीविना शेती

शेतातील पिके जमिनीवर उभ्या किंवा रांगत्या स्थितीत वाढताना दिसतात. त्यांची मुळे मात्र दिसत नाहीत, कारण ती मातीत रुतलेली असतात. माती पिकांच्या मुळांना आधार देते. त्याचबरोबर वनस्पतींना आणि त्यांच्या मुळांना वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण व आवश्यक अन्नद्रव्ये पुरविते. पण हे घटक इतर कुठून मिळाले तर वनस्पती मातीशिवायही वाढू शकते. असे मातीविना वनस्पतींच्या वाढीचे तंत्र १९३० साली विकसित झाले. त्यास ‘हायड्रोपोनिक्स’ म्हणतात. हायड्रोपोनिक्स हा शब्दप्रयोग ग्रीक भाषेतील आहे. त्याचा अर्थ ‘पाण्याला काम करू द्या’ असा होतो.

गच्चीवरची बाग : खत खरेदी सावधतेने

सध्या बाजारात, इंटरनेटवर किचन वेस्टचे कंपोिस्टग वा खत करणाऱ्या विविध महागडय़ा परदेशी साधनांची रेलचेल झाली आहे; हौशी, पर्यावरणप्रेमींना याची सविस्तर माहिती नसल्यामुळे हे खर्चीक प्रकार खरेदी केले जात आहेत. अशी साधने खरेदी करण्यापूर्वी खालील मुद्दय़ांप्रमाणे खात्री करून घ्या.

गच्चीवरची बाग : खरकटय़ा अन्नापासून खतनिर्मिती

शिजलेले उरलेले वा खरकटे अन्न आपणाला अनेकदा फेकून द्यावे लागते. ते फेकून न देता त्याचा उपयोग खत म्हणूनही करता येतो. शिजलेले खरकटे अन्न उन्हात वाळवून घेतल्यास त्याचे केक किंवा पापडासारखे खडे तयार होतात. ते चुरून झाडांना देता येतात. तसेच शिजलेल्या खरकटय़ा अन्नाचे वेगळ्या पद्धतीनेही व्यवस्थापन करता येते. त्यासाठी पुढील पद्धती वापरता येतील.

पर्यावरणस्नेही टोपलीची दुहेरी करामत

ह्या लेखाचा पहिला भाग

शहरी विभागात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ही एक मोठी समस्या असून उपलब्ध असलेली डम्पिंग ग्राऊंड्स त्यासाठी अपुरी ठरू लागली आहेत. शहराच्या विविध भागांमधून दररोज गोळा होणाऱ्या शेकडो मेट्रिक टन कचऱ्यामुळे क्षेपणभूमींवर कचऱ्याचे अक्षरश: डोंगर उभे राहिले असून त्यातून पर्यावरण आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यातील जयंत जोशी यांनी घरातच कचऱ्याचे विस्थापन करणाऱ्या सोप्या पद्धतीचा वापर करून या समस्येवर उत्तर शोधले आहे. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असणाऱ्या जोशींनी घरातील सर्व ओल्या कचऱ्याचे व्यवस्थित विघटन होणारी प्लास्टिकची टोपली वापरण्यास सुरुवात केली असून ती त्यांच्या घरासाठी छोटय़ा डम्पिंग ग्राऊंडचे काम करते. या कामाबद्दल ती कोणताही मोबदला घेत नाहीच, शिवाय कचऱ्यापासून बनलेले उत्तम प्रकारचे दोन-अडीच किलो खत दरमहा त्यांना देते.

घरगुती क्षेपणभूमीत कचऱ्यापासून काळे सोने

ह्या लेखाचा दुसरा भाग

मुंबईतील देवनार, मुलुंड, ठाण्यातील डायघर अथवा कल्याणमधील आधारवाडी अशा सर्वच क्षेपणभूमींची कचरा व्यवस्थापन करण्याची क्षमता संपुष्टात आली असून त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या कचऱ्याच्या डोंगरांना सातत्याने आगी लागून पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आता वैयक्तिक स्तरावर घरात अथवा सोसायटीच्या आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असून मुंबई-ठाण्यातील हजारो कुटुंबांनी ओला कचरा विघटित करून त्याचे खतामध्ये रूपांतर करणाऱ्या पर्यावरणस्नेही टोपलीचा पर्याय स्वीकारला आहे.

ठाणे ग्राहक पंचायतीनेही त्यांच्या ग्राहकांना इतर जीवनोपयोगी वस्तूंसोबत ही पर्यावरणस्नेही टोपली उपलब्ध करून दिली आहे

झाडांसाठीची संजीवके

सावकाश विरघळणारी घन स्वरूपातील खते झाडांना वरचे वर देणे गरजेचे आहे. तसेच बागेतील रोपांना द्रावणयुक्त खतेही देणे महत्त्वाचे व गरजेचे असते. कारण ती ताबडतोब लागू होतात. विशेषत: फळे, फुले धरण्यासाठी, फुलगळती होऊ नये यासाठी ही द्रावणयुक्त खते गरजेची आहेत. ही फक्त द्रव नसून ते झाडांसाठी संजीवनी देणारी आहेत, म्हणून त्यास संजीवक असे म्हणतात. त्याद्वारे मातीची उपजावू क्षमता वाढते. म्हणजे मातीत जीवाणू संख्या ताबडतोब वाढते तसेच उपयुक्त जीवाणू कार्यरत होतात. कालांतराने नष्ट होतात. व त्यांचेच अतिसूक्ष्म स्वरूपात जैव खत तयार होते. या नसíगक चक्रामुळे झाडांना वेळोवेळी पोषण मिळते व झाडे टवटवीत होतात, बहरतात. ही संजीवके घरच्या घरी व साध्या-सोप्या पद्धतीने तयार करता येतात.

राज्यीय प्राणी, पक्षी व कीटक

वृक्ष, फुलं, पक्षी,प्राण्यांच्या देशा - भाग १ इथे

जारुळासारख्याच शेकडो स्थनिक झाडाझाडोऱ्याने भरलेल्या जंगलात नांदणारा महाराष्ट्राचा राज्यीय प्राणी म्हणजे शेकरू! खार म्हटली की पिटुकली, गोंडस झुपकेदार शेपूट उडवत तुरुतुरु पळणारा प्राणी आपल्या नजरेसमोर येतो. पण शेकरू मात्र खारीच्या या वर्णनाच्या अगदी उलट आहे असं म्हणता येईल. शेपटीसकट साधारण तीन ते साडेतीन फूट लांबीची ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. पश्चिम घाटांची रांग, सदाबहार किंवा ओल्या पानझडी अरण्यात, पूर्व हिमालयाच्या तळटेकडय़ा, तसेच मध्य भारताच्या काही भागांतच ही खार दिसून येते. ज्या अरण्यांमध्ये मुबलक फळझाडे असतात अशा ठिकाणी हिचं वास्तव्य असतं. ‘इंडियन जायंट स्क्विरल’ म्हणून ओळखलं जाणारं शेकरू अगदी उंचच उंच झाडांच्या शेंडय़ांवर राहणं पसंत करतं. शक्यतो झाडावरून जमिनीवर येण्याचं हे टाळतं. या टाळाटाळीसाठी एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे उडय़ा मारत जाण्याच्या यांच्या सवयीने लोक शेकरालाच ‘उडती खार’ समजतात. पण उडत्या खारींप्रमाणे यांच्या पायाला पडदे नसतात. शेकराच्या या उडय़ा अगदी पंधरा-वीस फूट लांब असतात. शेकरू उडी मारतं आणि आपण समजतो की शेकरू उडतंय. या लांबलांब उडय़ा मारताना शेकराला त्याच्या लांब पायांचा आणि तोल सांभाळायला दीड-दोन फूट लांब झुपकेदार शेपूट उपयोगी ठरते. राखाडी, काळसर रंगाचं शरीर असलेलं शेकरू तसं पाहायला गेलं तर मस्त गब्दुल असतं. पोटाकडे फिक्कट रंग आणि त्याच रंगाची शेपटी असलेलं, सकाळ-संध्याकाळच्या सुमारास अगदी उत्साहाने उडय़ा मारणारं शेकरू, दुपारी मस्तपकी विश्रांती घेतं. विश्रांती म्हणजे, पोटोबा फांदीवर टेकवायचा आणि हातपाय व शेपूट फांदीवरून खाली सल सोडून चक्क झोपायचं! आहे ना मजेशीर सवय?

राणीचे फूल

वृक्ष, फुलं, पक्षी,प्राण्यांच्या देशा - भाग २ इथे

दर एक मे रोजी उत्साहाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताना आपल्याला आपल्या राज्याचा वृक्ष म्हणजेच राज्यवृक्ष, तसंच राज्यपक्षी, राज्यप्राणी, राज्यफुलपाखरू माहीत असायला हवेत.

लहानपणी भूगोल हा रटाळच असतो अशी धारणा बाळगून शिकल्यावर, शालेय जीवनातलं भूगोलाचं पुस्तक, शाळा सुटली पाटी फुटली उक्तीप्रमाणे आपल्यापासून दूर जातं ते कायमचं. शालेय जीवनात असल्या ‘बोअरिंग गोष्टी’ पुढे जनरल नॉलेजच्या पेपरला दत्त म्हणून समोर येतात आणि आपल्या मेंदूला कामाला लावतात. हे जनरल नॉलेजचे पेपरवाले काय काय विचारत बसतात. विविध स्पर्धा, वेगवेगळे देश, त्यांचे झेंडे, त्यांची प्रतीकं वगरे वगरे. असला डोकेबाज अभ्यास करताना जाणवतं की बहुतांश देशांना, त्यातल्या प्रांतांना, राज्यांना स्वत:ची मानचिन्हं आणि प्रतीकं असतात. ही मानचिन्हं तिथल्या संपदेशी, निसर्गाशी जोडलेली असतात. नुकताच एक मे, अर्थात महाराष्ट्र दिन साजरा झाला. १ मे १९६० साली स्थापन झालेल्या महाराष्ट्राची जैविक संपदा वाखाणण्याजोगीच आहे. आज आसमंतातल्या गप्पांमध्ये महाराष्ट्राची चिन्हं अर्थात स्टेट सिम्बॉल्स बघताना नक्की जाणवेल की महाराष्ट्र नसíगक संपदेने किती समृद्ध आहे.

वसंतात बेभानपणे फुलणाऱ्या ठळक झाडांमध्ये निसर्ग बहुतांश लाल पिवळा रंग भरभरून उधळत असताना कुठेतरी हळूच नाजूक गुलाबी, जांभळा रंग दिसायला सुरुवात होते. ‘प्राइड ऑफ इंडिया’, क्वीन ऑफ फ्लॉवर अशी विविध इंग्रजी नावं मिरवणारां हा सुंदर जांभळा मोहोर आपल्या राज्याचं फुलं म्हणून ओळखला जातो. मराठीत जारूळ, तामण म्हणून ओळखलं जाणारं हे झाड महाराष्ट्राचं राज्य फूल, अर्थात स्टेट फ्लॉवर म्हणून सन्मानित झालंय.

गृहवाटिका : बागेची शोभा वाढवा

आतापर्यंतच्या लेखात सांगितल्याप्रमाणे कुंडीत झाडं लावून गृहवाटिकेचा आनंद आपण घेऊ लागलो की, गृहवाटिकेसंबंधी आणखी काही गोष्टी माहीत असणं, करता येणं आवश्यक आहेत. त्यातील काही पुढे देत आहे.

झाडांची कुंडी बदलणे:
झाड आणि कुंडी यांचं प्रपोर्शन चांगलं दिसण्यासाठी लहान झाडासाठी लहान कुंडी वापरणं अपेक्षित आहे. मात्र, जेव्हा झाड मोठं होतं तेव्हा ते मोठय़ा कुंडीत हलवायची गरज भासते. लोखंडी पट्टीच्या साहाय्याने आपण लहान कुंडीतलं झाड मोठय़ा कुंडीत लावू शकतो.

एकमेवाद्वितीय फ्लॉरिडा गार्डन

जगातल्या विविध प्रकारच्या फळाफुलांच्या, मसाल्यांच्या झाडांचं नुसतं दर्शनच फ्लॉरिडा गार्डनमध्ये होत नाही, तर सोबतच्या गाईडकडून त्यांची माहितीही मिळते. झाडाला हात लावता येत नाही, पण खाली पडलेली फळं चाखताही येतात.

मायामीहून अर्धा तास साउथ-वेस्टच्या दिशेने ड्राइव्ह केलं, की तुम्ही होमेस्टेडला पोचता. परिसरात झालेला बदल जाणवायला लागतो. हिरवाई वाढलेली दिसते. काँक्रीटची जंगलं कमी झाल्यासारखी वाटतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाज्यांचे मळे, फळबागा डोळ्यांना गारवा देतात. फ्रूट आणि स्पाइस पार्क या निसर्गरम्य परिसरात चपखल बसणारा असाच आहे. अमेरिकेतला हा एकमेव बोटॅनिकल फ्रूट आणि स्पाइस पार्क.

बागेला पाणी देण्याच्या पद्धती

बागेला पाणी देण्याच्या अनेक पद्धती आहेत. अर्थात त्याचे काही लांबचे, जवळचे फायदे तोटे आहेतच. कधी गरज, सोय असते तर कधी नाईलाजही असतो. खालील विस्तारानुसार आपण योग्य त्या पद्धतीचा अवलंब करावा. बागेला किंवा कुंडय़ांना आपण जसे पाण्याची सवय लावू त्याप्रमाणे झाडांना पाण्याचा वापर करण्याची सवय लागते. उपलब्ध पाणी किती व कसे मिळते यावर त्यांच्या बाष्पीभवनाचा वेग झाडे ठरवतात. त्यामुळे पाणी कसे व किती द्यावे हे बागेचे ठिकाण, वाऱ्याचा वेग याचा विचार करून ठरवणे योग्य असते.

गच्चीवरची बाग: खतासाठी माठाचा उपयोग

नैसर्गिक खत तयार करण्यासाठी माठाचा चांगला वापर होतो. ओला, हिरवा कचरा या माठात टाकल्यास त्याचेही छान खत तयार होते. ही पद्धतही फ्लॅटमध्ये उत्तमरीत्या अंमलात आणता येते.

गच्चीवरची बाग : ‘किचन वेस्ट’ची किमया

‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पना साकारणे तितकेसे अवघड नाही. प्रामुख्याने घरात दोन प्रकारचे किचन वेस्ट वा स्वयंपाकघरातील कचरा तयार होते- भाज्यांची हिरवी देठं, फळांची सालं, टरफलं इत्यादी. आणि खरकटे, शिजलेले पदार्थ.

धान्याच्या कोठ्या वा रबरी टायरचा वापर

गच्चीवर बाग फुलवण्यासाठी आपण अक्षरश मिळेल त्या साधनांचा वापर करून घेणार आहोत. तेलाचे डबे किंवा जुन्या ड्रमप्रमाणे लोखंडी संपुटे, जी पूर्वी रॉकेल वाटपासाठी शिधावाटप केंद्रांवर दिसून यायची. या संपुटासाठी उत्तम प्रकारचा जाड व गंजरोधक पत्रा वापरलेला असतो. या संपुटात भाजीपाला विशेषत वेलवर्गीय व फळझाडांची लागवड करता येते. या संपुटांना जमिनीच्या पृष्ठभागापासून थोडय़ा उंचीवर, विटांवर ठेवल्यास ती खूप दिवस टिकतात. जमिनीवरच ठेवल्यास या भांडय़ांचा तळ पाणी लागल्याने लवकर खराब होतो. अर्थात यांनाही पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाजवळ भोकं पाडण्याची गरज आहेच.

या लोखंडी भांडय़ाप्रमाणे धान्य साठवण्यासाठीच्या कोठय़ाही झाडं लावायला उत्तम ठरू शकतात. यात आपण फळझाडांची लागवड करू शकतो. या कोठय़ांची खोली बऱ्यापकी असते. म्हणूनच यात रिपॉटिंग करणे तसे अवघड असते. मात्र गंजू नये म्हणून यांना आतून ऑइलपेंट देऊ नये. झाडांच्या आरोग्याला ते घातक ठरते.

आहे पावसाळा तरीही...

पावसाळा हा खरे म्हणजे वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त असतो. वातावरणात असणारी ७० टक्क्यांपेक्षा जास्त आद्र्रता, योग्य प्रकारे पडणारा पाऊस आणि त्यामुळे मिळणारे पाणी या दोन्हींमुळे वनस्पती चांगल्या प्रकारे वाढतात.

आपल्या गच्चीत, बाल्कनीत झाडे लावण्यासाठी हा योग्य हंगाम आहे. या काळात आपल्या मित्रमैत्रिणींकडून आपल्याला आवडणाऱ्या झाडांची कटिंग आणून कुंडीत लावावी. त्यासाठी हा उत्तम काळ आहे. कारण हवेतल्या दमटपणामुळे झाडांच्या कटिंगना मुळे येण्यास अनुकूल वातावरण असते. ज्या झाडांची वाढ शास्त्रीय पद्धतीने होऊ शकते, अशा झाडांची कटिंग बोटाएवढय़ा जाड फांद्यांचे तुकडे केल्यास व ते मातीत लावल्यास त्यापासून नवीन झाड तयार होण्याची ९० टक्के शक्यता असते.

हिरवा कोपरा : नववर्षांसाठी गुलाबाचा आनंद अन् संदेश

पहिला भाग इथे

फार मोठी कुलमहती असणारा गुलाब घरी आणण्याचा संकल्प आपण नवीन वर्षांच्या सुरुवातीस केला आहे. आपल्या बागेचा सदस्य होणाऱ्या या सम्राटाच्या स्वागताची शाही तयारी हवी. सहा ते आठ तास उन्हाची जागा हवी. कुंडीत लावायचा झाल्यास चांगली भारदस्त निदान एक फूटभर व्यासाची आणि तेवढीच खोल कुंडी हवी. जमिनीत लावायचा झाल्यास दीड फूट लांब, दीड फूट रुंद आणि दीड फूट खोल खड्डा हवा. गुलाबासाठी सेंद्रिय माती वापरताना त्यामध्ये कोकोपीथ आणि नीमपेंड घालून कुंडी किंवा खड्डा भरून ठेवावा. आपल्या आवडीच्या रंगाचा हायब्रीड हीज वा फ्लोरिबंडा गुलाबाचे रोप आणता येईल. नामांकित रोपवाटिकेतूनच रोपं आणावीत. रोपं आणल्यावर आठ-दहा दिवस जेथे रोप लावायचे त्या जागी ठेवून पाणी घालावे. रोपास नवीन जागेची सवय झाली की रोपाची पिशवी अलगद कापावी. मुळातली घट्ट माती मोकळी करावी आणि शक्यतो सायंकाळी रोपाची लागवड करावी. रोप लावल्यावर त्यास पाणी द्यावे.

गच्चीवरची बाग : उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती

फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.

हिरवा कोपरा : फुलांचा सम्राट गुलाब

भाग दुसरा इथे

‘भाग्यवान मी या भुवनी असे’ कुणा झाडास वाटत असेल तर ते आहे फुलांचा अनभिषिक्त सम्राट गुलाबाचे झाड. गुलाबी थंडी आवडणारा, हिमालयासारख्या पर्वतरांगामधील जंगलात अधिवास असलेला गुलाब शेकडो वर्षांपासून माणसाच्या मनावर अधिराज्य करू लागला. कारण त्याचे अनाघ्रात सौंदर्य अन् मोहक सुगंध. या सौंदर्याने माणसाच्या सृजनशक्तीला जणू आव्हान दिले अन् अनेक निसर्गप्रेमी वनस्पतितज्ज्ञ, शास्ज्ञत्र, संशोधकांनी या झाडातील विविध गुण हेरले. त्यातून चांगल्या गुणांचा संकर करून अधिकाधिक गुणांच्या नव्या जाती निर्माण केल्या. गुलाबाची महती फार मोठी असल्यामुळे त्याचा कुलवृत्तान्त जाणून घेतल्याशिवाय आपण त्याच्या लागवडीकडे वळणे योग्य नाही.

परसातील बाग

वाढत्या जनसंख्येला राहायला उंच इमारतींशिवाय पर्याय नाही. पण, मग शहरात भाजीपाला पिकविता येणारच नाही का? याचे उत्तर क्युबा या देशाने शोधले आहे. क्युबाकडे साखर वगळता काहीच नव्हते म्हणून हा देश आयातीवर पूर्णपणे अवलंबून होता. १९९२ साली अमेरिकेने निर्बंध घातले. अशा वेळी देशाची स्थिती पूर्णपणे ढासळायला हवी होती. पण,त्यांनी यातून मार्ग काढला. खरं तर शहरी शेतीत क्रांती घडवली. हवाना शहरात उपलब्ध असलेली प्रत्येक जागा, जमिनीचा तुकडा, गच्ची, बाल्कनी, खिडकी, जिकडेतिकडे शेतीच शेती. जिथे जे शक्य असेल ते, कुठे धान्य, कुठे फळे तर कुठे भाज्या! काही ठिकाणी वैयक्तिक तर काही ठिकाणी सामाजिक. एवढी खाद्यपदार्थांची निर्मिती व्हायला लागली की अमेरिकेची गरजच भासली नाही. क्युबाचे बघून व्हेनेझुएला, पेरू या देशांतही अशा प्रकारची शेती सुरू झाली. भारतातही डॉ. जोशींनी मुंबईत तर राठीबाई नी यशस्वीपणे शहरी शेतीचा पाया घातला. आपल्याकडेदेखील आता शहरी शेती करण्याची गरज भासणार आहे.

हिरवा कोपरा : धातूंची खाण पिकलं पान!

पौष, माघ, फाल्गुन हे महिने झाडांचा पर्णहीन होण्याचा काळ. ठिकठिकाणची काटेसावरीची झाडे सारा पर्णसाज उतरवून बसली आहेत. जंगली बदाम, शिरीष हळूहळू पाने गाळीत आहेत. माझ्या घरासमोरचा महागुनीचा वृक्ष प्रतिवर्षी २६ फेब्रुवारीस पाने गाळायला सुरुवात करतो. वाऱ्यावर लहरत दोन दिवसांत पूर्ण पर्णसंभार खाली उतरतो अन् जमिनीवर पिवळट पानांचा मऊ मुलायम गालिचा पसरतो. मंद झुळकेसरशी भिरभिरत खाली पडणारी पोक्त पानं पाहिली की मन विरक्त होतं. या पानांचं कौतुकही वाटतं. आयुष्यभर झाडासाठी अन्न बनवायचं, खोड, मुळं, फुलं, फळं सगळय़ांचं पोषण करायचं, अन्न साठवायचं, चयापचयासाठी मदत करायची अन् ऋतुचक्र सांभाळत अलगद विलग व्हायचं. जे जवळ होतं तेही मातृवक्षालाच अर्पण करायचं. पौष, माघ, फाल्गुनातलं हे सौंदर्य बाहेरून रूक्ष, पण अंतरी ओलावा जपणारं. झाडांची अंत:प्रेरणा वाखाणण्यासारखीच. मातीतून, अचेतनातून ऊर्जा घेऊन सचेतन रूपाने प्रगटणे ही वनस्पतींची किमया. जमिनीतील अदम्य जीवनस्रोत प्राशन करून झाडांना कोवळे कोंब फुटतात. लवलवणारी पोपटी, तांब्रवर्णी पालवी पाहून मन प्रसन्न होते.

हिरवा कोपरा : सूर्यकिरणांची सुगी

उत्तरायणात कणाकणाने दिनमान वाढेल. सूर्याकडून जास्त ऊर्जा (इन्सोलेशन) मिळत जाईल. या ऊर्जेचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी ही ऊर्जा अन्न साखळीत कशी प्रवेश करेल याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. झाडे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने पानातील क्लोरोफिल, जमिनीतील पोषक पाणी वापरून स्वतसाठी अन्न बनवतात. अतिशय कौशल्याने हा तिहेरी गोफ गुंफून झाडे स्टार्च, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, आम्ले आणि इतर अनेक रसायनांची निर्मिती करतात. हे सगळे विस्मयकारक व आपल्यासाठी उपकारक आहे. या निर्मितीमध्येच ऊर्जा चक्र जपले जाते. शिषिरात म्हातारी पानं गळतात व वसंतात नवपालवीचे धुमारे येतात. पानांमध्ये म्हातारी पानं व कोवळी पानं कमी सूर्यऊर्जा वापरतात. तर, तरुण पाने जोमाने सूर्यऊर्जा वापरतात. त्यामुळेच ग्रीष्मापर्यंत ही पाने सज्ज होतात ती सौरऊर्जेचे व्यवस्थापन करायला आणि आपल्याला थंड, शीतल सावली द्यायला.

हिरवा कोपरा: टोमॅटो, मिरची, वांगी कुंडीतच फुलवा

बाल्कनीमध्ये सहा ते आठ तास ऊन असेल तर आडव्या क्रेटमध्ये मध्यम आकाराच्या कुंडीत वांगी, टोमॅटो, मिरची सहज लावता येतात. पाल्यापाचोळय़ापासून तुम्ही केलेली सेंद्रिय माती तयार असली तर ती वापरावी, नाहीतर आता अनेक गृहनिर्माण संस्था ओल्या कचऱ्यापासून माती बनवतात व विकतात. ती माती विकत आणू शकता. दोन घमेली माती, अर्धे घमेले कोकोपीथ, पाव किलो नीमपेंड एकत्र करून कुंडी भरून घ्यावी.

भाजीपाल्याच्या रोपांसाठी शहराबाहेरच्या नर्सरीला भेट द्यावी लागेल. शेतकऱ्यांसाठीच्या या नर्सरीमध्ये सर्व भाज्यांची रोपे मिळतात. काळय़ा प्लास्टिक ट्रेमध्ये घालून रोपे देतात. मित्रमैत्रिणींचा गट करून एकदम तीस-चाळीस रोपे आणून वाटून घेता येतात. प्रत्येक भाजीची आठ-दहा रोपे घ्यावीत, जेणेकरून एखादे जगले नाही तरी चार-पाच रोपे राहतात.

गृहवाटिका : गुलाब फुलेना

आकर्षक रंग आणि सुंदर मोठ फुल असलेलं गुलाबाचं झाड नर्सरीतून घरी आणल्यावर पहिल्यांदा २-३ फुले येतात आणि नंतर फुले येईनाशी होतात, हा अनुभव बरेच जणांचा आहे.

गुलाबाच्या फुलांचे आपण सर्वसाधारण ३ विभाग करूया.

गृहवाटिका : कुंडीतील झाडांची छाटणी

कुंडीतील झाड वाढल्यानंतर, फुलं यायला लागल्यानंतर निगा राखण्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे झाडांची छाटणी. झाडांच्या छाटणीमागे दोन-तीन प्रमुख कारणे असतात. एक-वाळलेला झाडाचा भाग काढून टाकण्यासाठी झाड छाटावं लागतं.

दोन- झाडांना छान आकार देण्यासाठी झाड छाटावं लागतं. मोठय़ा बागांमध्ये झाडांना छान छान आकार दिलेले आढळून येतात. आपल्या गृहवाटिकेतसुद्धा एखादे कुंडीतील झाड छान आकार दिलेले असावे. त्यासाठी लहान पाने असलेली झाडं वापरावीत. उदा. डय़ुरांडा. मिनिएचर तगर, मिनिएचर अेक्झोरा, इ. तसेच कुंडीचा आकार आणि झाडांचा आकार एकमेकांना साजेसा असावा. थोडक्यात छान आकार देण्यासाठी किंवा आकार मर्यादित ठेवण्यासाठी झाडांची छाटणी आवश्यक आहे.

गृहवाटिका : घरच्या घरी कंपोस्ट खत

आपल्या गृहवाटिकेसाठी आतापर्यंत आपण झाडासाठी घरातली योग्य जागा कुठली, कुंडी कशी असावी, माती कोणती वापरायची, झाड कसं लावायचं अर्थात कुंडी कशी भरायची , पाणी कसं आणि केव्हा घालायचं, कोणती साधने लागणार इत्यादी गोष्टी समजून घेतल्या. कुंडीतल्या मातीची क्वालिटी वाढवण्यासाठी कम्पोस्टोपयोगी पदार्थ’ उदा. फळे, भाज्या यांच्या साली, डेखं , बिया, खराब निघालेली भाजी, तसेच निर्माल्य म्हणजे सुकलेली फुले, पाने, इत्यादी कसे वापरायचे हेही समजून घेतलं.

सर्व कुंडय़ांमध्ये कम्पोस्टोपयोगी पदार्थ घालूनसुद्धा जर घरात कम्पोस्टोपयोगी पदार्थ उरत असतील तर कंपोस्ट तयार करण्यासाठी वेगळी कुंडी करावी. या कुंडीला आपण खतकुंडी म्हणूया !

माती आणि सूर्यप्रकाश

कुंडीत झाड लावताना आणि त्याची निगा राखताना पुढील ४ गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. कुंडी, कुंडी ठेवण्याच्या जागी उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश, माती आणि पाणी. गेल्या लेखात दिल्याप्रमाणे योग्य कुंडीची निवड केल्यानंतर झाड लावण्यासाठी पुढची गरज म्हणजे माती.

झाडाला माती जितकी चांगली मिळेल तितके ते सुदृढ राहील. झाड सुदृढ असलं की त्याची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहते आणि त्यावर रोग, किडी यांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यासाठी उपलब्ध असलेल्या मातीमध्ये १:१ (एकास एक ) या प्रमाणात कंपोस्ट मिसळावे. हे मिश्रण झाड लावण्यास वापरावे. पालापाचोळा, फुले, भाज्या किंवा फळे यांचा टाकाऊ भाग इत्यादी पदार्थ कुजल्यानंतर तयार होणारी माती म्हणजे कंपोस्ट. गृहवाटिकेत घरच्या घरी कंपोस्ट कसं तयार करायचं हे आपण पुढच्या लेखांमध्ये बघणार आहोत. शेणखत वापरायचं असल्यास माती आणि कंपोस्ट या मिश्रणाच्या एक अष्टमांश, इतकंच शेणखत त्यात मिसळावं. शेणखत जास्त झाल्यास, तयार होणाऱ्या उष्णतेमुळे झाडं मरण्याची शक्यता असते.

निसर्गाची माया

पुण्यातील मध्यवर्ती भागातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सुनील-प्रिया भिडे या दाम्पत्याने हिरवीगार बाग फुलवली आहे. गेल्या वर्षी केळीच्या एका घडाला ८८ केळी लागली आणि भोपळ्याच्या नाजूकशा वेलीला ५० भोपळे लगडले. आवळा घेऊन कोहळा देणारी ही निसर्गाची माया त्यांनी आपल्याबरोबरच परिसरातील लोकांमध्येही मुरवली आहे, या दाम्पत्यांविषयी..

बियाणं व बीज प्रक्रिया

फळभाजी किंवा पालेभाजीची लागवड करताना बियाणं शक्यतो गावरान वापरावं. गावरान बियाणांना उत्पादन कमी असतं, हा भ्रम आहे. उत्तम माती, खतं मिळाली तर विश्वास बसणार नाही एवढं उत्पादन ते देतं. गावरान बियाणं हे सबुरीनं गोळा करावं लागतं, त्याचं जतन, संवर्धन करावं लागतं. गावरान बियाणं नसेल तर संकरित बियाणं हे छोटय़ा प्रमाणातही मिळतं. पण ते एकदा फोडलं की ते संपूर्ण वापरून घ्यावं.

गच्चीवरची बाग- भाजीपाला फुलवताना

भाजीपाल्याची लागवड करावयाची असल्यास त्यास चार ते सहा इंच खोली पुरेशी होते. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना बियाणे किंवा देठाची लागवड केली तरी चालते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत. खोडे तसेच जमिनीत ठेवावीत. पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांत त्यास नवीन फुटवा येतो व आपल्याला भाजी मिळते.

कमी जागेतील लागवड

आपण आपल्या बागेत फुलांच्या झाडांसोबत भाजीपाला ही कसा पिकवू शकतो हे पाहणार आहोत. शहरात उपलब्ध जागेत बाग फुलवायची म्हणजे जागेची मोठी अडचण असते. कमीत कमी जागेचा अधिकाधिक उपयोग करून घेणं त्यासाठी बागेची मांडणी करणं, तसेच रोपांची कमी जागेत अधिकाधिक लागवड करणं याविषयीची कल्पकता आपणास स्वत: विकसित करावी लागते. ती सरावाने विकसित होत जाते.

गच्चीवरची बाग : कुंडीचे पुनर्भरण करताना

कुंडीतील भरण-पोषण हे खाली खाली बसत जाते, त्यामुळे त्याचे पुनर्भरण ठरावीक दिवसांनी करणे गरजचे असते. कुंडी, बादली, ड्रम याचे पुनर्भरण करताना कुंडी भरण्याचीच भरण-पोषण पद्धत वापरावी.

पूर्वीचे कुंडीतील रोप किंवा छोटे झाड हे अलगद आजूबाजूची माती काढून काढावे, जास्तीची मुळे धारधार व स्वच्छ कैचीने कापून टाकावीत. पूर्वीची कुंडी रिकामी करण्यासाठी कुंडीचे २-३ दिवस पाणी तोडावे. प्लॅस्टिक कुंडी असल्यास त्यास चारही बाजूंची चेप द्यावा किंवा हाताने थोपटावी.

गच्चीवरची बाग : भाताचे गवत, पालापाचोळा

नैसर्गिक संसाधने गच्चीवरची बाग फुलवण्यात मोलाची भूमिका बजावतात. भाताचे गवत हे त्यापैकीच एक.

आंब्याच्या पेटीत किंवा चिनी मातीच्या कुंडय़ा/शोभेच्या वस्तू वगैरेंच्या खोक्यांमध्ये हे गवत सहज पाहायला मिळते. भाताचे गवत खत म्हणून खूपच उत्तम असते. हे गवत भिजल्यावर त्याचे झपाटय़ाने खत तयार होते. यातून झाडांच्या पाढंऱ्या मुळांना उच्च प्रतीचे खत मिळाल्यामुळे कुंडीतील झाडांची वाढ झपाटय़ाने होते.

भाताच्या गवताचे बारीक तुकडे करून किंवा आहे तसेही ते कुंडीच्या तळाकडून चौथ्या थरात वापरावे. हे झाडांच्या वरील भागात आच्छादन म्हणूनही वापरता येते. कोरडय़ा स्थितीत हे गवत दीर्घकाळ संग्रही ठेवता येते. रिपॉटिंग करण्यासाठी याचा अवश्य वापर करावा. भाताचे गवत कुंडीत पर्यायी थर म्हणूनही वापरता येते.

गच्चीवरची बाग : उसाचे चिपाड आणि वाळलेल्या फांद्या

मातीबरोबर कुठल्या नैसर्गिक बाबींचा वापर आपण गच्चीवर बाग फुलवण्यासाठी करू शकतो, याविषयी आपण माहिती घेत आहोत. नारळाच्या शेंडय़ांप्रमाणेच उसाचे चिपाड हेही नैसर्गिकपणे उत्तम बाग फुलवण्याचे साधन ठरू शकते. रसवंतीगृहाबाहेर मुबलक प्रमाणात उसाचे चिपाड आढळून येते. मात्र उसाचे चिपाड हे वाळलेल्या स्वरूपातच वापरावे. ओले वापरू नयेत. त्यात अळ्या तयार होण्याचा संभव असतो. सुकलेले उसाचे चिपाड हे दीर्घकाळ संग्रही ठेवता येते. छोटय़ा कुंडय़ांमध्ये वापरावयाचे असल्याने त्याचे बारीक काप किंवा भुगा तयार करून घ्यावा. वाळलेल्या चिपाडाचा हातानेही भुगा होतो.

गच्चीवरची बाग : नैसर्गिक संसाधनांचा वापर

घराच्या गच्चीत/ बाल्कनीत बाग-बगीचा फुलवताना बाजारातील तयार खत व माती यांच्यासह, सहजतेने उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग करणं गरजेचं आहे. नैसर्गिक संसाधनं म्हणजे ‘किचन वेस्ट’ जसं की हिरवा कचरा, खरकटं अन्न, खरकटं पाणी इत्यादी. तसंच झाडांच्या वाळलेल्या काडय़ा, सुकलेला पालापाचोळा, सुक्या नारळाच्या शेंडय़ा, सुकवलेले उसाचे चिपाट.. देशी गाईचं सुकं किंवा ओलं शेण. हे सारे घटक मातीचं पोषण वाढवतात.

याचबरोबर पायवाटेतली रानातली किंवा वडाच्या झाडाखालची काळी तसंच लाल माती घरच्या झाडांसाठी अत्यंत उपयुक्त असते. भाताचं तूस, गवत हेदेखील उत्तम प्रकारच्या खताचा स्रोत आहे. बागेसाठी भरमसाट माती वापरणं किंवा मातीच न वापरणं या दोन टोकांपेक्षा योग्य प्रमाणात माती वापरणं हा पर्याय बागेसाठी सुवर्णमध्य साधणारा आहे.

गच्चीवरची बाग : लोखंडी जाळी, किचन ट्रे इत्यादी

उपयुक्त भाजीपाला पिकवण्याबरोबर घरात आल्यावर विसाव्याचे ठिकाण म्हणून गच्चीवरची बाग सजवता आली तर दुग्धशर्करायोगच!

गच्ची वा बाल्कनीमध्ये मर्यादित जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचेही आव्हान असते. म्हणूनच व्हर्टकिल फाìमगचा पर्याय अलीकडे लोकप्रिय होऊ लागला आहे. यासाठी बाजारात उपलब्ध असणारी सच्छिद्र जाड तारेची लोखंडी वा प्लास्टिकची जाळी मिळते. या जाळीचा उपयोग करता येतो. ही जाळी एखादी बादली अथवा टबमध्ये तेवढय़ाच आकाराएवढी व ३-४ फूट उंचीची जाळी बसवावी. त्यास आतून हिरव्या रंगाच्या शेडनेटचे किंवा कापडाचे अस्तर द्यावे.

गच्चीवरची बाग : पुठ्ठ्यांची खोकी व सुपारीची पाने

बाजारात अनेक प्रकारची पुठ्ठय़ांची खोकी उपलब्ध असतात. किराणा दुकानात बिस्किटांचे खोके मिळतात. तर कधी आपल्या/ मित्राच्या घरी किंवा इलेक्ट्रॉनिक दुकानात फ्रिज, टीव्ही, वॉिशग मशीन, प्रिंटर्स यांची मोठमोठी खोकी उपलब्ध होतात. अर्थात या खोक्याच्या जाडीवर त्यांचा टिकाऊपणा अवलंबून असतो, पण या खोक्यांना पातळ प्लॅस्टिकचे आवरण आतून दिल्यास या खोक्याचे आयुष्यमान वाढते. प्लॅस्टिकचे आवरण दिल्यास किंवा प्लॅस्टिक कोटेड असलेल्या खोक्यामधून पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी भोकं पाडावेत किंवा आतील पाणी बाहेर निघून जाण्यासाठी प्लॅस्टिक नळाचे आऊटलेट द्यावे. प्लॅस्टिक कापडाचे आवरण दिलेली खोकी ही वर्ष-दीड वर्षे तरी टिकतात. वरील पसरट भाग अधिक मिळाल्यामुळे त्यात विविध पालेभाज्या लावता येतात. मोठय़ा, रुंद खोक्यामध्ये फळझाडे चांगली तग धरतात. अर्थात त्यांना कालातंराने स्थलांतरित करणे गरजेचे होते.

गच्चीवरची बाग : तेलाचे डब्बे

आपल्याकडे एकत्र कुटुंबात, लग्न समारंभात, एखाद्या कार्यक्रमात वा हॉटेलात तेला-तुपाचे डबे वापरले जातात. हे डबे पत्र्याचे असतात. या डब्यातही छान बाग फुलवता येते. या तेलाच्या डब्यांना छोटय़ा अ‍ॅक्सल ब्लेडने कापावे, म्हणजे डब्याच्या पत्राला धार येत नाही. कटर मशीनने कापल्यास धार येते व अपघाताची शक्यता वाढते.

गच्चीवरची बाग : बूट -बाटलीचा वापर

पायात घालायचे बूट वापरून कंटाळा आला की आपण ते फेकून देतो तसेच लहान मुलांचे बूट, हे वाढत्या वयाबरोबर पायात होत नाहीत. असे बूट रंगीत व आकर्षक असतात. त्यांचा वापर आपण रोपे लावण्यासाठी करू शकतो. गमबूटमध्येही झाडे लावू शकतो. त्यांच्यातही सीझनल फुले छान दिसतात. सीझनल फुले ही कमी जागेत भरभरून येतात. तसेच वाढदिवस, मुलांची पार्टी अशा कार्यक्रमाप्रसंगी अशी प्रकारच्या वस्तूतील बाग ही कार्यक्रमाची शोभा वाढवतात.

गच्चीवरची बाग : विटांचे वाफे

प्लॅस्टिकच्या पिशव्या, गळक्या बादल्या वा वेताच्या करंडय़ांप्रमाणेच गॅलरीत/गच्चीवर पुरेशी जागा असेल तर किंवा जमिनीवरच आपण विटांचे वाफे करू शकतो. यात भाज्या चांगल्या येतात. गच्चीवर वाफे विविध तऱ्हेने बनवू शकतो. वाफा िभतीलगत असल्यास त्याची रुंदी अडीच फुटांपेक्षा जास्त नसावी. लांबी कितीही चालू शकेल.

गच्चीवरची बाग : जमिनीवरील वाफे

विटांच्या मदतीने गच्चीवरच्या अरुंद वा छोटय़ा जागेत वाफे कसे करायचे याची माहिती आपण घेतली. त्याहून अधिक जागा म्हणजे ओपन टेरेसप्रमाणे जागा असेल व तेथे फुलझाडे व भाजीपाला यांची लागवड करायची असेल तर अशा जागेवर लांबचलांब वाफे करण्याची संधी असते. येथे जागेचा कल्पकतेने वापर करून वाफे गोलाकार, चौकोनी, आयताकृती, त्रिकोणी, षट्कोनी अशा आकारांचे करता येतात. वाफ्यांमध्ये निव्वळ माती भरण्यापेक्षा, अधिकाधिक पालापाचोळ्याचा वापर करावा म्हणजे दीर्घकाळ त्याचा परतावा मिळवता येतो.

गच्चीवरची बाग : वेताचे करंडे, तुटक्या बादल्या

बाग फुलवण्यासाठी मातीच्या कुंडय़ा हा सर्वोत्तम पर्याय आहे. या दृष्टीने पर्यावरणीय हित लक्षात घेता बांबूचे, वेताचे करंडे वापरणे हे सर्वोत्तम आहे. यात पाण्याचा निचरा चांगला होतो व सर्व बाजूने वायू विजन होत असल्यामुळे करंडय़ातील बायोमासचे छान खतही तयार होते. करंडय़ाचे, टोपलीचे आयुष्यमान हे वर्षभराचे असले तरी कालांतराने त्यात तयार होणारी माती ही रोपांसाठी उपयुक्त असते.

गच्चीतल्या बागेत परदेशी फुलांचा बहर

घरातल्या घरात अगदी करवंटीपासून कमाल दीड फूट उंचीच्या विविध आकाराच्या कुंडय़ांमध्ये निरनिराळ्या वृक्षांची जोपासना करणाऱ्या ठाण्यातील डॉ. नंदिनी बोंडाळे यांच्या बागेत सध्या बँकॉकमधील अ‍ॅडेनियम जातीची फुले फुलली आहेत. भारतात अ‍ॅडेनियम जातीची एकेरी फुले बघायला मिळतात. मात्र ठाण्यातील त्यांच्या या घरातल्या बागेत आलेली ही फुले बहुरंगी आणि बहुपदरी आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात डॉ. नंदिनी यांनी बँकॉकमधून फुलांचे रोप आणून आपल्या गच्चीतील बागेत लावले. त्याला आता एक वर्षांनी फुले आली आहेत.

शहर शेती: झाड लावताना..

मनुष्याला कायमच निसर्गाची ओढ असते. ही ओढ आपण आपल्या घरात, गॅलरीत, गच्चीत, जिन्यात, सोसायटीच्या आवारात, नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून पूर्ण करत असतो. पण झाडाची लागवड कशी करावी, त्याला किती व कधी पाणी द्यावे, त्याची निगा कशी राखावी, त्याचे कीड व रोग यांपासून संरक्षण कसे करावे? असे अनेक प्रश्न आपल्याला सतावत असतात. या लेखातून हीच माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू.

कुंडीमधील वनस्पतींना आवश्यक असलेले प्राथमिक घटक म्हणजे माती, पाणी व सूर्यप्रकाश. त्याचा विचार खालीलप्रमाणे-

१) माती: कुंडय़ा भरताना प्रथम तळाशी मोठे खापराचे, विटांचे तुकडे टाकावेत म्हणजे कुंडय़ांची भोके बुजणार नाहीत. नंतर माती भरताना माती ज्या प्रकारची असेल त्याप्रमाणे त्यात वाळू, शेणखत, राख, नारळाच्या शेंडय़ा, कोकोपीट (नारळाचा भुस्सा) किंवा लाकडाचा भुस्सा इ. मिसळावे लागते.