कोथिंबीर आणि पुदिना घरच्या घरी

आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच गरज लागणारी गोष्ट म्हणजे हिरवे मसाले. स्वयंपाक स्वादिष्ट बनवण्यासाठी कोथिंबीर पुदिना हे मसाले हमखास हवे असतातच. हे आणि इतर काही हिरवे मसाले घरच्या घरी सहजच वाढवता येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची रोपे आपणांस नर्सरीतून विकत आणण्याचीही गरज नसते. आपल्या स्वयंपाकासाठी आपण बाजारातून जे हिरवे मसाले आणतो, त्यांतीलच काही आपण लागवडीसाठी वापरू शकतो.

हे मसाले घरच्या घरी वाढवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे ते आपल्यास हवे तेव्हा व ताजे असेच मिळवता येतात. बाजारातून आणून फ्रिजमध्ये ठेवलेले मसाले आपला स्वाद काही प्रमाणात तरी गमावून बसतात. त्या उलट आपणच वाढवलेले मसाले वापरण्यात फक्त गंमतच नसते तर त्यांचा नैसर्गिक स्वादही आपण अनुभवू शकतो.

आलामांडा

आलामांडा ही बहुगुणी वनस्पती अशी आहे की, तिला वेलीसारखे किंवा झुडपासारखेही वाढवता येते. साधारण बोगनवेलीसारखी वाढ असणारी ही वनस्पती आहे. अशा वनस्पतींना इंग्रजीत रँब्लर (rambler) अशी संज्ञा आहे. रँब्लर ही संज्ञा साधारणपणे वेल-गुलाबांना वापरली जाते. आलामांडाला सर्वसंमत असे मराठी भाषेतील नाव नाही; परंतु काही ठिकाणी आलामांडाला मराठीत कर्णफूल असे संबोधले जाते. आलामांडाचे इंग्रजीतील साधारण नाव आहे ‘Golden Trumpet’. आलामांडा आता भारतातील बागांत सर्वत्र सापडत असला तरीही ह्य़ा वनस्पतीचे मूळ स्थान भारत नाही; तिचे मूळ स्थान दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल, मेक्सिको आणि अर्जेटिना येथे आहे. आलामांडाचे कूळ आहे Apocynaceae. खूरचाफा किंवा देवचाफाही ह्य़ाच कुळातील आहे. परंतु खुरचाफ्याच्या काही जातींची फुले सुगंधी असली तरीही आलामांडाच्या कुठल्याही जातीतील फुलांना सुगंध नसतो. आलामांडाच्या पानांना, बुंध्याला किंवा इतर कोणत्याही भागाला इजा झाली तर जखमेतून दुधासारखा पांढरा चीक निघतो. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांना हा चीक त्वचेवर लागल्यास थोडा फार त्रास सहन करावा लागतो; परंतु त्वचा लालसर होऊन खाज येणे इतपतच हा त्रास असतो.

कृष्णकमळ

निळ्या-जांभळ्या रंगाच्या कृष्णकमळाची फुले अनेकांना माहीत असतात. त्याची गच्च पसरणारी वेल, त्यातूनच डोकावणारी मोहक आणि सुवासिक फुले आपणा सर्वाना हवी हवीशी वाटतात. परंतु कृष्णकमळाच्या अनेक जाती अनेक रंगांत उपलब्ध असतात, हे मात्र अनेकांना माहीत नसते. आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की काही कृष्णकमळांच्या पाकळ्या अगदीच अनाकर्षक असतात. याचे उदाहरण म्हणजे, आपल्या सर्वाना माहीत असलेले निळ्या-जांभळ्या रंगाचे कृष्णकमळ. याच्या पाकळ्या अगदीच फिकट निळ्या रंगाच्या असतात. पाकळ्यांच्या बाहेरील बाजूस संदले असतात. फुलण्याआधी कळी ज्या हिरव्या, पाकळ्यांसम दिसणाऱ्या अवयवांत अवगुंठित असते ती म्हणजे संदले. आता पाकळ्या अनाकर्षक असल्याने, कीटकांना आकृष्ट करण्यासाठी त्या निरुपयोगी ठरतात. परंतु त्याची भरपाई त्याच फुलातील असंख्य असे तंतुमय अवयव करतात. या आकर्षक अशा तंतूंच्या वलयास ‘परिवलय’ असे म्हणतात. त्यास इंग्रजीमध्ये Corona असे संबोधले जाते. मात्र काही कृष्णकमळांच्या फुलांत पाकळ्याही सुंदर असतात आणि त्या फुलांतही विरळ असे परिवलय असते.

युफोर्बिया मिली

युफोर्बयिा मिली ही चिकाच्या निवडुंगाचीच एक जात आहे. भारतात अनेक ठिकाणी शेताच्या कडेला कुंपणासाठी चिकाच्या निवडुंगाची लागवड केली जाते; कारण ह्य़ा निवडुंगाला काटेही असतात आणि गुरे-ढोरेही चिकाचा निवडुंग किंवा त्याची पाने खात नाहीत. खरे तर चिकाच्या निवडुंगाचे मूळ स्थान भारत नसून आफ्रिका खंडातील वाळवंटी प्रदेश आहे. ह्य़ा चिकाच्या निवडुंगाला फुले येत असली तरी ती अगदीच छोटुकली व अनाकर्षक असतात. पण ह्य़ा चिकाच्या निवडुंगाचे एक जवळचे भावंड म्हणजे युफोर्बयिा मिली.

डेंड्रोबियम ऑर्किड

ऑर्किड या वनस्पतीचे दोन प्रकार असतात. एका प्रकारातील ऑर्किड हे निसर्गात जमिनीत वाढणारे असतात तर दुसऱ्या प्रकारचे ऑर्किड वृक्षांच्या बुंध्यांचा आधार घेऊन तेथेच वास्तव्य करत असतात. या दोन्ही प्रकारांमधील, वृक्षांच्या आधाराने वाढणाऱ्या ऑर्किड, डेंड्रोबियमची फुले जास्त आकर्षक असतात. ती जमिनीत वाढणाऱ्या ऑर्किडपेक्षा जास्त कणखरही असतात. अनेक दिवस पाणी मिळाले नाही तरीही त्यांचे फार नुकसान होत नाही.

कुमुदिनी

पाण्यात फुलणाऱ्या अनेक फुलांना मराठीत आपण कमळ म्हणतो; त्यामध्ये लोटस आणि वॉटर लीली हे दोन प्रकार प्रामुख्याने असतात. ही दोनही फुले एकाच कुळातील असली तरीही शास्त्रीयदृष्टय़ा त्यांची जात वेगवेगळी आहे. त्यांचे कूळ आहे Nymphaeceae. उपरोक्त जाती जरी सर्वाना प्रिय असल्या तरीही त्या घराच्या छोटय़ा बाल्कनीत किंवा िवडोबक्समध्ये वाढवणे कठीणच असते; कारण त्यांच्यासाठी बऱ्यापकी मोठय़ा टाकीची गरज असते. तसेच त्यांना भरपूर फुले येण्यासाठी खूप उन्हाचीही गरज असते. मोठी टाकी आणि भरपूर ऊन बाल्कनीत किंवा िवडोबक्समध्ये ठेवणे/मिळणे शक्य नसते. मग त्याची भरपाई आपण दुसऱ्या एका वनस्पतीची लागवड करून आपली हौस भागवू शकतो. ही पाण्यात वाढणारी वनस्पती म्हणजे कुमुदिनी.

सुरण

र्षांतील जवळजवळ आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. मोठय़ा नवलाची गोष्ट म्हणजे, सुरणाला वर्षांतून एकदाच आणि एकच पान येते. चांगल्या पोसलेल्या सुरणाचे पान एखाद्या छत्रीएवढे मोठे असू शकते. सुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक प्रकार होय. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीस हा जमिनीतील कंद आपली सुप्तावस्था सोडून वाढू लागतो. त्याचा जमिनीबाहेर वाढणारा, सरळ उंच खोडासारखा वाढणारा अवयव म्हणजे सुरणाच्या एकुलत्या एक पानाचा देठ असतो. या पानाच्या देठावर सापाच्या अंगावर असणाऱ्या चट्टय़ासारखे चट्टे असतात. देठाच्या वरच्या टोकाला छत्रासारखे संयुक्त पान असते. या एकाच पानाच्या सहाय्याने सुरण आपले प्रकाशसंश्लेषणाचे काम करून, आपल्या जमिनीतील कंदात तयार झालेले अन्न साठवत असतो.

अग्निशिखा

इतके सुंदर फूल व त्याचे नावही तितकेच अप्रतिम; अगदी दुग्धशर्करा योगच म्हणायचा. नेमेचि येतो मग पावसाळा आणि त्या पावसाळ्यातही नेमेचि फुलणारे फूल म्हणजे अग्निशिखा. अग्निशिखा म्हणजे ज्योत. या फुलाची प्रत्येक पाकळी म्हणजे अक्षरश: समईची किंवा निरांजनाची ज्योतच वाटते. कळ्या फुलताना त्या हिरवट-पिवळ्या असतात; नंतर त्या पिवळ्या होतात. कालांतराने पाकळ्यांची टोके लालसर दिसू लागतात. या स्थितीत त्या हुबेहुब ज्योतीसारख्याच दिसतात. शेवटी सर्वच पाकळ्या लाल होऊन जातात.

लसूणपात

आज आपण ज्या वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे लसूणपात. तिचे शास्त्रीय नाव आहे Allium tuberosum. ही वनस्पती लसणेचीच एक जात आहे; परंतु या वनस्पतीला आपल्या नेहमीच्या लसणेसारखा कंद नसतो. तसे असेल तर मग या लसूणपातचा काय उपयोग, असे तुम्हाला खचितच वाटेल. हिच्या पानांचा स्वाद हुबेहूब लसणेसारखाच असतो. ही एकदा लावली की वर्षभर आपल्यास तिची हिरवीगार पाने मिळण्याची सोय होते. लसूणपातच्या पानांची चटणी केली तर तिला अगदी लसणेच्या पानांच्याच चटणीची चव व स्वाद येतो. नेहमीच्या लसणेसारखी ही सुप्तावस्थेतही जात नाही, हा तिचा आणखी मोठा फायदा.

कोस्टस

आपल्या मराठीत एक म्हण आहे, ‘पेव फुटले आहे.’ एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ही म्हण आपण वापरतो. पेव या शब्दाचा अर्थ धान्य साठवायची कणगी असा असला तरी पेव ही एक औषधी वनस्पतीही आहे हे अनेकांना माहीत नसेल. पेन्वा असेही हिचे आणखी एक नाव आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकणातल्या अनेक रानावनांतून हिचे कोंब एकाच वेळी जमिनीतून फुटून बाहेर पडू लागतात. सर्वत्रच पेवाचे छोटे छोटे कोंब दिसू लागतात. यावरूनच तर ‘पेव फुटणे’ ही म्हण प्रचारात आली असेल का?

जरबेरा

जरबेराची छोटी झाडे साधारण १५ ते २० सेंमी आकाराच्या कुंडय़ांमधून सहज वाढवता येतात. प्लस्टिकच्या पिशवीतील जरबेराची रोपे साधारणपणे १५ ते ३० रुपयांपर्यंत नर्सरींमधून उपलब्ध असतात. जरबेराच्या जुन्या जाती नव्या हायब्रीड जातींपेक्षा जास्त कणखर असतात. जुन्या जातीचे एक रोप लावल्यास वर्षांअखेर त्यातून आपल्याला कमीत कमी ५ ते ६ नवी रोपे मिळतात. कारण जरबेराच्या रोपाला जमिनीतून नवे फुटवे फुटतात; त्यांचे विभाजन करून अधिक रोपे बनवता येतात. जुन्या जातींमध्ये सिंगल फुलांच्या (पाकळ्यांची एकच रांग) व डबल फुलांच्या (भरगच्च पाकळ्यांच्या) असे अनेक रंगांतील प्रकार मिळतात.

या फुलांचे देठ मात्र जरा बारीक असले तरी लांब देठांवर ही साधारण शेवंतीसारखी दिसणारी फुले फारच आकर्षक दिसतात. यांना जवळजवळ वर्षभर फुले येत असतात. पूर्ण उन्हाची जागा यांना मानवते. मातीत ओलावा नेहमीच टिकून राहील हे पाहावे, परंतु पाणी फार जास्त झाल्यास किंवा पाण्याचा निचरा बरोबर न झाल्यास जरबेराची रोपे कुजण्याची शक्यता असते.

विलायती पालक

आपल्या छोटय़ाशा परसबागेत किंवा अगदी आपल्या बाल्कनीतही सहजपणे वाढवता येईल अशी एक पालेभाजी म्हणजे ‘विलायती पालक’. अनेक नर्सरीतून याची रोपे शोभेची झाडे म्हणून विक्रीस ठेवलेली दिसतात. तसे पहिल्यास ही मृदुकाय वनस्पती शोभिवंत तर आहेच, पण तिच्या पानांचा व कोवळ्या देठांचा पालेभाजी म्हणून उपयोग करता येतो हे अनेकांना माहीत नसते. ही वनस्पती बहुवर्षांयू असल्याने ती एकदा लावल्यास दोन ते तीन वर्षांपर्यंत विनासायास व भरगच्च, गर्द वाढते. हिची पाने कोवळ्या बुंध्यासकट पालेभाजी म्हणून वापरता येतात. साधारण तीन वर्षांनंतर तिची वाढ खुंटते. त्या वेळी तिचेच साधारण ३ ते ४ इंचांचे लांब बोखे काढून त्यांपासून नवी रोपे करता येतात. विलायती पालकाला साधारणपणे एक वर्षांनंतर कंदमूळ तयार होते. कंदमुळापासूनही आपल्यास अभिवृद्धी करता येते. तसेच काही फुलांना चिमुकली फळेही धरतात. फळांतील बिया जमिनीवर पडून आपोआप रुजतात; त्यांचीही पुनर्लागवडीने अभिवृद्धी करता येते.

कॅलाडियम

काही वनस्पतींची पाने त्यांच्या फुलांपेक्षा सुंदर दिसतात. कॅलाडियम ही असलीच एक वनस्पती आहे की, जिची फुले बिलकूल आकर्षक नसतात. आजकाल नर्सरींमधून कॅलाडियमचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. अळूच्या पानांसारखा आकार असणाऱ्या या वनस्पतींची पाने अनेक रंगांची असतात. अनेक रंग पानांवर शिंपडल्याप्रमाणे प्रकार आढळतात. कॅलाडियम ही वनस्पती अळूच्याच कुळातील आहे. कॅलाडियमलाही अळूच्या कंदासारखे कंद जमिनीमध्ये असतात. हे कंद म्हणजेच कॅलाडियम/अळूची खोडे असतात. जमिनीबाहेर फक्त उंच देठावर पाने दिसतात. फुलेही अधूनमधून धरत असतात. साधारण अँथुरियमच्या फुलांप्रमाणेच कॅलाडियमच्या फुलांची रचना असली तरी, त्या फुलांना शोभा नसते. कॅलाडियम, अँथुरियम, अळू, मनीप्लांट या सर्व एकाच (Araceaea) कुळातील वनस्पती.

डिस्चिडिया

डिस्चिडिया बेंगालेन्सिस (Dischidia bengalensis) ही एक छोटुकली व गर्द वाढणारी वेल आहे. ही वेल भारतातीलच असून बंगालमधील वनांत ही आढळून येते. ही होया वेलीची जवळची नातलग. दोन्ही (Asclepiadaceae) कुळातील. ह्य वेलीला अगदीच लहान, पांढरी फुले येतात. फुलांना सुगंधही नसतो. तसे असल्यास आपणास वाटेल की असली वेल आपण का लावावी. ही लावण्याचा मुख्य फायदा हा की, ही वेलही मातीशिवाय, अगदी लाकडाच्या ओंडक्यावरही वाढवू शकतो. हिची मांसल, लंबगोलाकार पाने फारच आकर्षक दिसतात. डिस्चिडियाचे बरेच प्रकार उपलब्ध होऊ शकतात. त्यात व्हॅरिगेटेड पानांची (हिरव्या पानांवर पांढरे चट्टे असलेली जात), हृदयाकृती पानांची, पानांवर नाजूक सफेद रेघा असलेली अशा जाती उपलब्ध आहेत.

बिगोनिया रेक्स

"आम्हाला घरामध्येही फुलझाडेच हवीत" असे सांगणारे अनेक भेटतात. फुलझाडे सर्वानाच आवडत असली तरी घरात, सावलीत ठेवण्याजोगी फुलझाडे त्या मानाने कमीच असतात. परंतु फुलांएवढीच मनमोहक, रंगीत पानांची छोटेखानी वनस्पती म्हणजे बिगोनिया रेक्स. या वनस्पतीला फुले असतात, परंतु ती काही फारशी सुरेख नसतात. बऱ्याच वेळा ती पानांखाली दडलेली राहतात. या वनस्पतीची मुळे तंतूमय असतात; तसेच ती फार खोलवर न जाता मातीच्या वरच्या थरातच वाढत असतात. म्हणून यांना उथळ व पसरट कुंडय़ाच जास्त उपयुक्त ठरतात. हँगिंग बास्केटमधूनही शोभून दिसतात. रोपे जसजशी वाढत जातात तसतशी ती पसरत जाऊन आपल्या पसरट, मोठाल्या, शोभिवंत पानांनी सर्वच कुंडी व्यापून टाकतात. जणू काही पानांचा गालिचाच पसरला आहे असे वाटते.

थर्माकोलपासून टेबलटॉप लँडस्केप

गणपती बाप्पाच्या मखरासाठी वापरला जाणारा थर्माकोल नंतर टाकून न देता त्याच्यातून काही वेगळं बनवता आलं तर..

गणपतीच्या सजावटीसाठी व पॅकिंगसाठी वापरलेला थर्माकोल (पॉलियुरेथीन) शेवटी इतस्तत: टाकून दिला जातो. यामुळे पर्यावरण दूषित होतेच आणि नाल्यांमध्ये, गटारांमध्ये थर्माकोल अडकून रस्त्यांवर व इतर ठिकाणीही सांडपाणी साचून अनारोग्यास आमंत्रण दिले जाते. या थर्माकोलचे विघटन होण्यास अनेक वष्रे लागतात; दर वर्षी या प्रदूषणात भर पडतच असते. जोपर्यंत थर्माकोलचे उत्पादन व वापर होत राहणार, तोपर्यंत हे प्रदूषण होतच राहणार; त्यावर कसलाही उपाय सध्या तरी दिसत नाही. तर मग होणारे प्रदूषण रोखणे शक्य नसेल तर निदान टाकाऊ

मल्टी व्हिटामिन प्लांट

आपल्या भारतात अनेक औषधी वनस्पतींचे खजिने अगदी सदापर्णी जंगले, रखरखीत वाळवंटे ते हिमालयापर्यंत आढळतात. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की, "अशी एकही वनस्पती नाही की जिच्यामध्ये औषधी गुण नाहीत, फक्त मनुष्यच ती ओळखण्यास कमी पडतो." आपल्या भारतातील पश्चिम घाटातील एका अतिशय उपयुक्त अशा वनस्पतीची आज ओळख करून घेऊ.

ही वनस्पती एक झुडूप आहे. दिसायला साधारणपणे कढीपत्त्यासारखी असते. हिचा उपयोग पालेभाजीसारखा करता येतो. दक्षिण भारतात हिचा वापर बऱ्याच प्रमाणात होत असला तरीही महाराष्ट्रात अजूनही ही बहुगुणी वनस्पती अनोळखीच राहिली आहे. हिला सर्वसाधारणपणे कटुक, चेकुरमाणीस आणि स्वीट लीफ या नावांनी ओळखले जाते. हिचे शास्त्रीय नाव आहे ‘Sauropus androgynus’. ही आवळ्याच्या कुळातील, म्हणजेच ‘Euphorbiaceae’ कुळातील आहे. इतर कुठल्याही पालेभाजीपेक्षा हिच्यामध्ये व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असल्यानेच हिला ‘मल्टी व्हिटामिन प्लांट’ हे नाव दिले गेले आहे. १०० ग्रॅम पानांत पुढीलप्रमाणे व्हिटामिन व इतर पौष्टिक गुण आढळतात. एनर्जी ५९ कॅलरीज, ६.४ ग्रॅम प्रोटीन, १.० ग्रॅम प्रोटीन, १.० ग्रॅम फॅट, ९.९ ग्रॅम काबरेहायड्रेट, १.५ ग्रॅम फायबर, १.७ ग्रॅम अ‍ॅश, २३३ मिग्र्रॅ कॅल्शियम, ९८ मिग्रॅ फॉस्फरस, ३.५ मिग्रॅ आर्यन, १०,०२० कॅरोटीन, १६४ मिग्रॅ व्हिटामिन ए, बी आणि सी, ८१ ग्रॅम पाणी.

आवृतबीजी वनस्पती

आपल्या आजूबाजूला जी हिरवळ दिसते ती सर्व या गटातील वनस्पतींमुळे आहे. आवृतबीजी वनस्पती आजपर्यंतच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील सर्वोत्तम निर्मिती आहे. त्यांच्यात उच्च प्रतीच्या कार्याचे विभाजन झालेले आढळते. उदा. मुळे, खोड, पाने, फुले आणि फळे. या वनस्पतींच्या आकारात आणि आधिवासात प्रचंड वैविध्य आहे. अगदी लहानात लहान वोल्फिया जे टाचणीच्या डोक्याच्या आकाराचे असून पाण्यावर तरंगत वाढते. मोठाल्या वृक्षांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास एक मोठा समूह आपल्या डोळ्यासमोर येतो, वड, पिंपळ, आंबा, चिंच, नीलगिरी इत्यादी.

आवृतबीजी वनस्पतींचे दोन भागांत विभाजन केले जाते. एकबीजपत्री उदा. गवत, बांबू, नारळ इत्यादी आणि द्विबीजपत्री – वड, पिंपळ

सपुष्प वनस्पतींमधील विवाह संस्था

वनस्पती अचल असतात. प्राणी मात्र चल म्हणजे फिरू शकणारे असल्याने आपला जोडीदार किंवा जोडीदारीण स्वत: शोधू शकतात व त्यांचे मीलन होते. त्यामुळे निसर्गाने वनस्पतिंमध्ये मीलन घडवून आणण्यासाठी अनेक आश्चर्यजनक योजना केल्या आहेत.

वनस्पतींमध्ये शुक्रनिर्मिती फुलांच्या पुंकेसरांत तर स्त्रीबीजनिर्मिती स्त्रीकेसरात होते. उभयिलगी फुलांमध्ये पुंकेसर तसेच स्त्रीकेसर असतात. तर काही फुलांत केवळ पुंकेसर असलेली नरपुष्पे असतात किंवा केवळ स्त्रीकेसर असलेली स्त्रीपुष्पे असतात.

निसर्ग परागकण विविध प्रकारे व वेगवेगळ्या दूतांमार्फत स्त्रीकेसरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. परागकण स्त्रीकेसरात रुजल्यावर त्यातील शुक्राणूंचा स्त्रीबीजाशी संयोग होतो व बीजधारणा होते. अशा रीतीने वनस्पतींमधील विवाह सोहळा संपन्न होतो.

शहर शेती : श्रावणातले वनस्पती संवर्धन

रावणातील निसर्गानुभव अतिशय आनंददायी असतो. अनेक साहित्यिक आणि कवींनी विविध प्रकारे त्याचे वर्णन केले आहे. ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ ही कविता सर्वश्रुतच आहे. जूनमध्ये पावसाळा सुरुवात झाल्यानंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्यापर्यंत निसर्गात विविध वनस्पती उगवितात. त्यातील अनेक वनस्पती विविध व्याधींमध्ये औषध म्हणून तसेच सकस आहार म्हणून उपयुक्त आहेत. या उपयुक्त वनस्पतींची माणसांना नीट ओळख व्हावी, पुढील पिढय़ांपर्यंत माहितीचा तो ठेवा संक्रमित व्हावा, या हेतूने विविध व्रतवैकल्ये आणि सणांमध्ये हटकून वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. व्रतवैकल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वनस्पती औषधी असणे हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही. व्रतवैकल्यांच्या माध्यमातून वनस्पती संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

झाडांची अभिवृद्धी

झाडांची अभिवृद्धी प्रामुख्याने बियांपासून, छाटकलमाने (फांदी लावून), गुटीकलमाद्वारे, भेट कलमाद्वारे, पाचर कलमाद्वारे, डोळा भरून किंवा पानाच्या तुकडय़ांची लागवड करून व कंदांपासून आणि सकर्सपासून होते. पण सर्वात नवीन प्रकार म्हणजे टिश्यू कल्चर, पण यासाठी मोठय़ा प्रयोगशाळेची आवश्यकता असते. यात झाडाच्या पेशींचे शेकडो तुकडे करून त्यांपासून झाडे बनवली जातात, जी एकाचप्रकारची व एकाच वयाची असतात.

सामान्यपणे सर्वच मोठय़ा झाडांची अभिवृद्धी बियांपासून होते. तसेच बऱ्याच फुलझाडांची नवीन रोपे बियांपासून सहजपणे करता येते. झाडावर फुले जुनी झाली किंवा सुकली की एक तर त्यांना फळे येतात ती कॅप्सूलसारखी असतात. परिपक्व झाल्यावर ही फळे बऱ्याच वेळा फुटतात व बी सर्वत्र पसरते. यामुळे त्यांचे बी जर आपणास गोळा करावयाचे असेल तर ती पिवळसर झाल्यावर त्यांना काढावे अथवा शेंगास्वरूपात असताना त्याला दोरा अथवा रबरबँडने गुंडाळून ठेवावे म्हणजे शेंगा फुटून ही इतरत्र पसरणार नाहीत. तर काहींच्या बिया फुलांच्या मधल्या भागात असतात. याची फुले पूर्णपणे सुकल्यावर त्यांचे बी गोळा करू शकतो. झेंडू, झीनीया, फ्लॉक्स, कॉसमॉस, बालसम (तेरडा) यांसारख्या फुलांच्या बिया त्यांच्या देठाजवळ असतात. त्या सहजपणे पडत नाहीत.

गच्चीवरची बाग

आधुनिक काळातली घरची परसबाग म्हटलं की, गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण ही बाग करू शकतो. आपण जर शेवटच्या मजल्यावर राहत असू तर उत्तमच. तुम्हाला गच्चीवर झाडं लावता येतील. कुंडय़ांशिवाय ही बाग असेल. जर खडबडीत जागा असेल तर त्या जागी एक फुटापेक्षा जास्त माती टाकावी.

अँथुरियम

आपली एक गंमत असते. एखादे सुंदर फूल पाहिले की आपण म्हणतो, ‘अगदी प्लास्टिकच्या फुलासारखे दिसते.’ तसेच एखादे प्लास्टिकचे सुंदर फूल पाहिले की म्हणतो, ‘अगदी खरोखरीच्या फुलासारखे दिसते.’ तर आज आपण खरोखरीचीच फुले परंतु अगदी प्लास्टिकच्या फुलांसारखी दिसणारी व इतकेच नाही तर जवळजवळ एक महिन्यापर्यंत टिकणाऱ्या फुलांची ओळख करून घेऊ. अँथुरियम ही मनीप्लांट आणि अळूच्या कुळातील एक वनस्पती आहे. हिची मोठाली, हृदयाकृती व झळाळणारी पाने लांब देठावर शोभून दिसतात. ज्यांनी कोणी अळवाची फुले पहिली असतील, त्यांना अँथुरियम व अळू एकाच कुळातील आहेत हे लक्षात येईल. मनीप्लांट, फिलोडेंड्रन, अ‍ॅग्लोनेमा, डायफेनबेकिया याही सर्व अँथुरियमच्या कुळातीलच आहेत.

मान्सूनच्या आगमनाची वर्दी निसर्गाच्या वेधशाळेलाही!

उन्हाच्या तीव्र झळांनी बेजार झाल्यानंतर पावसाच्या सुखद धारा झेलण्यासाठी आतुर झालेल्यांची सगळी मदार आता फक्त हवामान खात्याच्या अंदाजांवर असते. परंतु जरा सूक्ष्मपणे आपल्या आजूबाजूला जरी डोकावले तरी ‘निसर्गाच्या वेधशाळे’तील अनेक छोटे-मोठे घटक आपल्याला पावसाच्या आगमनाची वर्दी देत असतात.

येत्या काही दिवसांत पाऊस धो-धो कोसळणार या जाणिवेने जंगल सक्रिय होतेच. पण शहरातल्या क्राँक्रीटच्या जंगलातही ही वेधशाळा तितकीच प्रभावीपणे कार्यरत असते हे विशेष! मुंबईतही पावसाला झेलण्याकरिता पक्षी, किडेमुंग्या सक्रिय झाल्या असून काहींची स्थलांतराची व निवारा शोधण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

प्राणिमित्र-पक्षिमित्र

पावसाळ्यातच नव्हे तर एरवीही संकटात सापडलेल्या, पण पाळीव नसलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना मदत करणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत. आणखी काही संस्थांची नावे आणि त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक.

मुंबईमधील प्राण्यांचा होणारा छळ थांबवून त्यांना मदत करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी झटणारी संस्था आहे, ‘द बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स’. त्यांचे ‘बाई साकराबाई दिनशॉ पेटिट प्राणी रुग्णालय’ प्रसिद्ध आहे. त्यांच्या हेल्पलाइनचे दूरध्वनी क्रमांक आहेत- ०२२-२४१३७५१८, ०२२-२४१३५२८५, ०२२-२४१३५४३४.

पक्षिवेडा

त्याचं नाव नोआ स्टायकर. वय अवघं २९ वर्षे. ज्या वयात आपल्याकडे स्थिरस्थावर होण्याची धडपड सुरू असते त्या वयात हा पक्षिवेडा चक्क पाठीवर एक बॅग लटकवून वर्षभरासाठी जगभर फिरला आणि त्याने तब्बल सहा हजारांच्यावर पक्ष्यांच्या नोंदी करून पर्यावरणविषयक दस्तावेजात मोलाची भर घातली आहे. त्याबद्दलचा त्याचा ब्लॉग म्हणजे तर पक्षिवैविध्याचा आरसाच आहे.

सर्वसामान्य जगाने वेडा म्हणावा असा एक ध्यास त्याने घेतला. एका वर्षांत किमान पाच हजार पक्ष्यांच्या प्रजाती पाहायच्या. पाचच का? कारण न थांबता जर प्रवास केला तर किमान इतक्या प्रजाती सहज पाहता येतील असा त्याचा ठाम विश्वास होता. त्याआधी तो दक्षिण-उत्तर अमेरिकेत भरपूर भटकला होताच. पण २०१४ मध्ये त्याच्या डोक्यात हे खूळ मूळ धरू लागले. आपल्यासारख्यांना हे खूळच वाटावे अशीच बाब आहे. कारण पक्षी पाहायला जाणे ही संकल्पनाच आपल्याकडे आत्ता कोठे रुजू लागली आहे. पण त्याने हे ठरवले. त्याला अनेकांनी पाठिंबा तर दिला, काही साधनसामग्री आणि अर्थसाहाय्यदेखील मिळाले. परत आल्यानंतरच्या त्या अनुभवावरील पुस्तकाच्या प्रकाशनाची खात्री मिळाली. अर्थात या सर्व व्यावहारिक बाजू झाल्या. पण महत्त्वाचे होता तो जगभरातील पक्षिप्रेमींनी निरीक्षकांनी दिलेला प्रतिसाद. त्याच जोरावर त्याने एक वर्षांत तब्बल ४१ देशांत भटकून सहा हजार ४२ पक्षी प्रजाती पाहिल्या. त्याच नाव नोआ स्ट्रायकर. हा मूळचा अमेरिकेतला. व्यवसायाने लेखक. एका मासिकाचे संपादनाचे काम पाहणारा आणि त्याचं वय अवघं २९ वर्षे.

सोनमोहोर आणि बहावा

श्रीलंका आणि मलयप्रांतातून आलेला सोनमोहोर आणि शंभर टक्के देशी असा आपला बहावा.. रणरणत्या उन्हात हे दोघंही फुललेत.. पण एक फक्त सावलीपुरता आणि दुसरा बहुपयोगी.
उन्हाळ्याच्या झळा जाणवायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा डोक्यात कितीतरी ‘उन्हाळा स्पेशल समीकरणं’ बनायला सुरुवात झालेली असते. उन्हाळा म्हणजे कमी पाणी, उन्हाळा म्हणजे निव्वळ घाम, उन्हाळा म्हणजे थंडगार पन्हं, उन्हाळा म्हणजे आंबा अशी ठरलेली मानवी समीकरणं तयार होत असताना निसर्गाने आपली जुनी समीकरणं आवरती घ्यायला सुरुवात केलेली असते. सावरीचे, पळसाचे लाल रंगाचे कोडे सुटले असतानाच त्याच आसमंतात पिवळ्या रंगाची समीकरणं तयार असतात. कोरडय़ा, रखरखीत रंगाच्या अस्ताव्यस्त नि कंटाळलेल्या आसमंतावर निसर्गाने पांढरे, पिवळे, हिरवे, पोपटी रंग शिंपडायला सुरुवात केलेली असते. सरत्या वसंताबरोबर या निसर्ग चित्रातला पिवळा रंग गडद झालेला सहजच जाणवून जातो. या जाणिवेला गडद करण्याचं काम आजूबाजूला काही झाडं न चुकता पार पाडत असतात. या झाडांबद्दल आपण खूप विचार करतो असं होतच नाही. थोडक्यात, ही झाडं अगदी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी ‘नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे, पावसात हिरवा झालो, थंडीत गाळली पाने’ च्या धर्तीवर स्वतचं ॠतुचक्र साजरं करत असतात. अगदी ताजं उदाहरण म्हणून सध्या अवतीभोवती बेभान फुललेल्या पेल्टोफोरम ऊर्फ कॉपर पॉड झाडाकडे बोट दाखवता येईल.

निंबोणीच्या झाडामागे

गुढीपाडवा आला की आपल्याला आठवण होते ती कडुलिंबाची. हे अस्सल भारतीय, बहुगुणी झाड आहे. कडुनिंब आणि कढीलिंब यातला आपला गोंधळ तर नेहमीच मनोरंजक असतो.

आज चत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. एका संवत्सरातून दुसऱ्या संवत्सरात प्रवेश करायचा दिवस. अर्थातच मराठी नवीन वर्षांरंभ. फाल्गुन संपून चत्रात प्रवेशणारा निसर्ग जणू उत्साहाने सळसळलेला असतो. आसमंतात या उत्साहाचं िबब सगळीकडे दिसत असतंच. नववर्षांच्या स्वागताला एका झाडाचं महत्त्व अचानक जाणवतं. गुढीपाडवा आणि हे झाड यांचं जणू अतूट समीकरणच बनलेलं असतं. लक्षात आलं असेलच की मी बोलतेय कडुिनबाबद्दल! गुढीला बांधायला, शास्त्रापुरती का होईना, निदान चार पानं तोंडात टाकायला याची आठवण हमखास होते. आपल्या देशात सर्वत्र आढळणारं सदाहरित प्रकारात गणलं जाणारं हे झाड जिथली हवा कोरडी असते, तिथे चक्क पानझडी बनून जोमानं वाढतं. देशात बहुतांश राज्यांमध्ये हे आढळत असल्याने बहुतेक सर्व भाषांमध्ये या झाडाला विविध नावे दिली गेली आहेत. मायबोलीत कडुिनब म्हणून ओळखलं जाणारं हे झाड िहदीत िनब म्हणून ओळखलं जातं. कडुिनब माहीत नसलेली व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल नाही! तरीही या झाडाचं वर्णन करायचं झालं तर याला साधारण मध्यम ते मोठय़ा आकाराचं म्हणता येऊ शकतं. ‘मेलिएसी’ कुटुंबातल्या पंधरा ते वीस मीटर उंच होणाऱ्या या झाडाबद्दल लिहावं तितकं कमीच ठरेल.

निसर्ग : वृक्षोपनिषद २

ह्या लेखाचा पहिला भाग इथे

वृक्षांचे महत्त्व संतांनीही जाणले होते. प्राचीन काळी तपस्वी, ऋषी-मुनी घनदाट जंगलात आश्रम उभारून वास्तव्य करीत. त्यांना ‘तपोवन’ म्हणत. आपल्या संस्कृतीतही ‘वानप्रस्थाश्रम’ सांगितला आहे. वयाच्या ५० ते ७५ वर्षे कालावधीसाठी ज्यात अरण्यात वास करून राहण्याचा संदेश आहे. पुराणात तसेच महाभारतात काही त्या वेळची महावने उल्लेखलेली आहेत ज्यात श्रीकृष्णाने, पांडवांनी व अन्य महात्मे, संत, तपस्वी यांनी वास्तव्य केले होते. ही महावने राजेमहाराजे वन्यप्राणी शिकारीसाठी वापरत, तसेच वनविहारासाठी. स्वच्छ सूर्यप्रकाश नैसर्गिक कंदमुळे फळफळावळे, शुद्ध हवा, पाणी, निर्झरांचे झुळझुळ वाहणारे प्रवाह. पशुपक्ष्यांचे आवाज इ. इ.मुळे मन-तन प्रसन्न ताजेतवाने होत असे. वृक्षांची अमाप संख्या असलेली ही वने मानवाला वरदान होती. श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय १२ तला श्लोक १८ असा :-

"सम:शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो:॥
शीतोष्णसुखदु:खेषु सम: सङ्गविवर्जित:॥"

निसर्ग : वृक्षोपनिषद १

ह्या लेखाचा दुसरा भाग इथे

वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष. याची जाण ठेवून प्रत्येकाने फक्त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही प्रयत्न करणं आवश्यक आहे.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग निसर्गप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणवाद त्यांनी समर्पकपणे सादर केला आहे. वृक्ष हे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेले, निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान, एक जीवनछत्र, एक आधार-मानवी जीवन व वृक्ष यांच्यात एक अतूट नाते आहे. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत, त्यांची एकसमयावच्छेदे पूर्ती करणारे हे निसर्ग देणे. अनादी कालापासून मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असलेले, मानवाच्या ऐहिक व आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणारे, सर्वाग उपयोगी पडणारे/ उपयुक्त असणारे, स्थितप्रज्ञ योग्यासारखे, वनचरे व पक्षी यांनाही अन्न, वस्त्र, निवारा देणारे जाती, धर्म, वंश, लिंग, शत्रू-मित्र, गरीब- श्रीमंत, रोगी-निरोगी, साक्षर-निरक्षर, काळा-गोरा, खुजा-उंच इ.इ. कसलाही भेदभाव न करता सर्वाना समभावनेने अंगाखांद्यावर खेळवणारे, वृक्ष हे केवळ मानवच नव्हे, तर सर्व सजीवांचे जीवनदायी तत्त्व आहेत. वृक्ष मानवी जीवनाचे तारक असल्याचे आपल्या पूर्वजांनी जाणले होते व त्यामुळे त्यांनी वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन इ. इ. सारखे कार्यक्रम सुरू केले व अनाठायी वृक्षतोड होऊ नये म्हणून ‘देवराया’ वगैरेसारखे उपक्रम धार्मिक श्रद्धांशी निगडित करून त्या उपक्रमांना एकप्रकारे सबल अधिष्ठान दिले. भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे वृक्षप्रेम अनादी कालापासून आहे, तसेच त्याचे संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. भारतीय सण, उत्सव आदींमधूनही वृक्षांना अधिष्ठान प्राप्त आहे. वृक्ष भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळवून आहेत.

शहर शेती: झाडे लावण्याचे ‘माध्यम’

आपण झाडे वेगवेगळ्या माध्यमांतून लावू शकतो. माती, कोकोपीट, पालापाचोळा, घरातील भाज्यांचे अवशेष इ. आपण जास्त करून झाडे मातीतच लावतो. यातील मातीचा पोत, प्रकार पाहून मग त्यात मातीच्या गरजेनुसार त्यात सेंद्रिय खते, वाळू, अन्नद्रव्ये घालून तिच्यात झाडे लावली जातात.

आपल्याला जर मातीची निवड करण्याची संधी असेल तर, अशी माती निवडावी की जी पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करते. अशी माती तपासण्याची सोपी पद्धत आहे. ओल्या मातीचा घट्ट दाबून लाडूसारखा आकार करावा व जमिनीवर सोडावा जर लाडू जमिनीवर पडून फुटला त मातीचा पोत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करणारा आहे आणि लाडू जर नुसता चेपला गेला तर त्यात चिकणमातीचे प्रमाण जास्त आहे असे समजावे. दुसऱ्या प्रकारच्या तपासणीत ओल्या मातीची रिबीनसारखी पट्टी करावी जर पट्टी तयार झाली व ती अखंड राहिली तर मातीची निचरा होण्याची क्षमता कमी आहे असे समजावे.जर मातीत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असेल तर त्यात झाडे चांगल्या प्रकारे वाढतात. झाडांच्या मुळांच्या चांगल्या वाढीसाठी व मातीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या वाढींसाठी मातीमध्ये ४५% खनिजे म्हणजे माती, ५% सेंद्रिय घटक व २५% हवा व २५% ओलावा (पाणी) आवश्यक असतो. जी पाण्याचा निचरा करते तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते.

भूतकाळाचे वर्तमान : घनदाट सावलीचे सौदागर!

लीकडे रोज नवीन नवीन उभी राहणारी गृहसंकुले, मॉल, टॉवर, तिथपर्यंत पोहोचणारे नवीन रस्ते, जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण यात शेकडो वर्षे उभी असलेली झाडे व दुर्मीळ वृक्ष नामशेष होऊ लागले आहेत. ठाणे महानगरपालिकेने रस्त्याच्या दुतर्फा आता नवीन व भराभर वाढणारी विदेशी वृक्षांची लागवड करावयास सुरुवात केली आहे. त्यात लाल फुलांचा सडा सांडणारा गुलमोहर (मदागास्कर बेट), पिवळ्या फुलांचा सोनमोहर (सिलोन-अंदमान बेट), जांभळ्या निळ्या फुलांचा नीलमोहर-जॅकारंडा (ब्राझिल) इत्यादी रंगीबेरंगी फुलांनी बहरत असलेले परदेशी वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावले जात आहेत. या वृक्षांमुळे रस्ता आणि सभोवतालच्या परिसराला एक वेगळीच झळाळी येते. राम मारुती रस्ता या वृक्षांमुळेच आता प्रसिद्ध होऊ लागला आहे. ठाणे नगरपालिकेने सुंदर ठाणे दिसण्यासाठी काही देशी फुलझाडांचाही उपयोग केलेला दिसतो. त्यात गुलाबी-लालसर व जांभळ्या रंगाच्या कांचन वृक्षाचा समावेश आहे. ठाण्यातील मासुंदा तलावपाळी परिसर व गोशाळा तलावाच्या ठाणे किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली कांचनाची झाडे लक्ष वेधून घेतात. या साऱ्या सुशोभीकरणात ठाण्यातील पुरातन वृक्षांकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.

गच्चीवरची बाग: इतर उपयुक्त वरखते

कडूलिंब किंवा निंबाला आपल्या आयुर्वेदात कल्पवृक्ष मानले गेले आहे. त्या झाडांच्या पंचघटकांचे (पान, फुलं, फळ, सालं, मुळ्या) मानवी आरोग्यास खूप फायदे आहेत. तसेच त्याचे शेतीला उपयोगी होईल असेही फायदे आहेत.

बाजारात निंबोळीची पेंड १६ ते २० रुपया किलो प्रमाणे मिळते. ही पेंड कोरडय़ा स्वरूपात असते. त्यातून झाडांना नत्र मिळते. हे खत हे झाडाला सावकाश मिळत असल्यामुळे झाडांच्या हळूवार पण खात्रीच्या वाढीस पूरक ठरते. ही खते बरेचदा माती मिश्रित असतात. ती पारखून वापरावीत. शुद्ध निंबपेड ही तेलकट असते. तिला उग्र कडू वास असतो. ती वाळवून झाडांना आठवडय़ातून एकदा चमचाभर दिली तरी उत्तम. निंबोळी खत व निंबोळी पेंड या दोन्हीत फरक आहे. निंबोळी खतात बरेचदा माती, युरिया मिसळलेला असतो.

गृहवाटिका : बागकामासाठी ‘गृहपाठ’ आवश्यक

‘कुंडीतील झाडे कार्यालय / घर अशा बंदिस्त जागेतील हवा किती शुद्ध करतात?’ याचं उत्तर आहे – ‘अगदी उंच पर्वतावर जेवढी शुद्ध हवा असते तेवढी.’ हे प्रत्यक्षात आणलेले आपण पाहू शकतो दिल्लीतील पहारपूर इंडस्ट्रीजमध्ये. दिल्ली हे सर्वात जास्त प्रदूषण असलेलं शहर, मात्र पहारपूर इंडस्ट्रीजच्या सहा मजली इमारतीमधील हवा पर्वतावरील शुद्ध हवेइतकी शुद्ध आहे. हवा शुद्ध करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात कुंडीतील झाडांचा वापर केला आहे. बिल्डिंगची गच्ची अगणित कुंडीतील झाडांनी भरलेली आहे. तसेच बििल्डगमध्ये माणशी चार कुंडय़ा या प्रमाणात कुंडीतील झाडे ठेवली आहेत. त्यात प्रामुख्याने स्नेक प्लांट (सर्पपर्णी), पीस लिली, अरेका पाम आणि मनी प्लांटचा समावेश आहे. गच्चीवरील झाडांमधून सक्र्युलेट केलेली हवा वातानुकूलित यंत्रणाद्वारे सर्व इमारतभर फिरवलेली आहे. ‘ग्रो फ्रेश एअर’ असंच तिथे म्हंटलं जातं आणि खरं आहे ते. भारतातल्या ‘ग्रीन बििल्डग’मध्ये या बििल्डगचा समावेश आहे. ‘ग्रीन बििल्डग’ ही एक वेगळी संकल्पना आहे, ज्यात झाडं हा एक घटक असतो.

खत, माती अन‌् पाण्याविना गच्चीवर भाजीपाल्याची शेती

शेतातील टाकाऊ वस्तू म्हणून बांधावर फेकून देण्यात येणाऱ्या केळीच्या खांबात माती, पाणी अाणि खताशिवाय भाजीपाला पिकवण्याचा प्रयाेग डाॅ.जे.बी.राजपूत यांनी त्यांच्या परसबागेत केला अाहे. केळीच्या खांबामध्ये असलेले पाणी अाणि विविध अन्नद्रव्य उपयाेगात अाणून डाॅ.राजपूत यांनी परसबागेत चांगल्या प्रकारची मेथीची भाजी उगवली अाहे. अातापर्यंत टाकाऊ वस्तू म्हणून शेतकरी केळीचे खांब फेकून देत हाेते. काही ठिकाणी संशाेधना अंती केळीच्या खाेडापासून धागा बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात अाले अाहे. मात्र, त्याचा वापर सहज शक्य नसल्याने शेतकरी अजूनही शेताच्या बांधावर केळीचे खांब फेकून देतात. या खांबाचा उपयाेग करण्याच्या दृष्टीने डाॅ.राजपूत यांनी परसबागेत प्रयाेग करून पाहिला. त्यांनी खांबामध्ये कमी दिवसांत येणारी मेथी लावल्यानंतर ती सहज उगवली.