कृष्ण तुळस ज्यांचे दारी आरोग्य नांदे त्यांचे घरी

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू धर्मात तुळशीला मांगल्याचे प्रतिक मानले जाते. केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात तुळशीच्या विविध जाती आढळतात.

प्राचीन आयुर्वेद ग्रंथांमध्ये तुळशीच्या चार प्रमुख जातींचा उल्लेख केलेला आढळतो:
१) कृष्ण तुळस, २) राम तुळस, ३) रान तुळस, ४) कापूर तुळस

या लेखामधून आपण या सर्व जातींमधील सर्वात प्रभावी अशा कृष्ण तुळशीबद्दल माहिती मिळवणार आहोत:

काजू मोहोर संरक्षण कसे करावे?

काजू हे परदेशी चलन मिळवून देणारे महत्त्वाचे पीक आहे. ते खऱ्या अर्थाने योग्यच आहे. कारण काजूगराच्या निर्यातीमधून आपल्या देशाला मोठया प्रमाणात परकीय चलन मिळते.

काजू हे परदेशी चलन मिळवून देणारे महत्त्वाचे पीक आहे. ते ख-या अर्थाने योग्यच आहे. कारण काजूगराच्या निर्यातीमधून आपल्या देशाला मोठया प्रमाणात परकीय चलन मिळते. महाराष्ट्रामध्ये होणा-या फळबाग लागवडीखाली येणा-या क्षेत्राचा विचार करता काजू पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

महाराष्ट्रात एकूण काजू लागवडीखालील क्षेत्र १.७५ लाख हेक्टर असून एकूण उत्पादकता १.५० लाख टन एवढी आहे. तथापि देशाच्या काजू उत्पादकतेचा विचार करता आपल्या देशाची सरासरी प्रति हेक्टर काजू उत्पादकता ही ८६५ किलो आहे. महाराष्ट्रात काजू पिकाचे सरासरी १.५ टन प्रति हेक्टरी एवढे उत्पादन मिळते. काजू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असून पीक संरक्षण ही एक महत्त्वाची बाब आहे.

फळे काढणीनंतरचे काजू बागेचे व्यवस्थापन

कोकणातील हापूस आंब्यानंतरचे महत्त्वाचे पीक म्हणजे काजू होय. शेतक-याना परकीय चलन मिळवून देणा-या या काजू पिकावर यंदाच्या हंगामात मात्र बदलत्या हवामानामुळे विपरीत परिणाम झाला.

या हंगामात जास्त काळ कमी तापमान राहिल्याने मोहोर आलेल्या ठिकाणी सयुक्त फुलांचे प्रमाण क मी राहिले व नर फुलांचे प्रमाण जास्त राहिले. यामुळे अपेक्षित फळधारणा झाली नाही. असा मोहोर मोठया प्रमाणावर सुकून गेला.

यातून शिल्लक राहिलेल्या मोहोराचा काजू हंगाम अखेरच्या टप्यात आला आहे. सध्या वातावरणामध्ये तापमान वाढल्यामुळे फळांच्या पक्वतेवर लक्ष ठेवून फळांची काढणी करणे आवश्यक आहे. जास्त तापमानामुळे फळे तडकू नयेत यासाठी जमिनीवर आच्छादन करावे.

खोडा सभोवताली पालापाचोळा टाकल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि जास्त तापमानाचा फळांवर होणारा परिणाम आपण कमी करू शकतो अशी माहिती श्री. कोकाटे यांनी दिली. तसेच शक्य असल्यास १० ते १२ लिटर पाणी प्रती झाड प्रती दिवस देणे फायद्याचे ठरेल.

फळभाज्या कुंडीत

फळभाज्या लावणं म्हणजे अतिशय नाजूक काम. पण अस्सल गावराण चवीच्या फळभाज्या खायच्या तर इतके कष्ट तर घ्यावेच लागतील.

आमचे आजोबा गावाहून शहरातल्या आमच्या घरी यायचे, पण पुन्हा गावी परत जाण्याची त्यांना खूप घाई असायची. ते म्हणायचे, इथल्या पाण्याला आणि भाजीला काही चवच नसते. मला त्यावेळी त्यांचं हसू यायचं. मला वाटायचं, पाणी आणि भाज्या सगळीकडे सारख्याच, त्यात चवीचं ते काय? पण मी जसजसा मोठा होत गेलो तसतसं मला समजत गेलं की, गावाकडच्या भाज्यांना खरंच एक चव होती. फक्त मीठ आणि मसाल्यात शिजवलेल्या त्या भाज्या पुन्हा पुन्हा खाव्याशा वाटत. आता लक्षात येतंय की, तो गुण त्या भाज्यांच्या वाणाचा आणि मातीचा होता. पूर्वी मिळणारा गोलमटोल टमाटा, हिरवी काटेरी वांगी, थोडीशी पोपटी पिवळसर भेंडी पुन्हा मिळाली तर; जेवणाची रंगतच वाढेल! हे सगळं शक्य आहे, आपल्या हिरव्या कोप:यात! पुण्यात राहणा:या अनघानं एकच गावठी वांग्याचं रोप लावलं. एकावेळी तिच्या त्रिकोणी कुटुंबाला पुरतील एवढी तीनच वांगी मिळायची. पण त्या वांग्याची भाजी एवढी चविष्ट व्हायची की, एकेक वांगं खाऊन कुणाचं मन भरत नसे!

रानहळदीचं रानफूल

रताच्या जीवसंपदेपैकी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे ‘हळद.’ हळद ही आपल्या देशाची सार्वभौम संपदा आहे. हजारो वर्षांपासून हळदीचे अनेक उपयोग इथे सर्वानाच माहीत आहेत. भारतात औषध म्हणून विविध प्रकारे हळदीचा उपयोग केला जातो. जखमेतील स्राव थांबवण्यासाठी पू होऊ नये म्हणून आणि खोकल्यावर दूध-हळद वापरणे हा तर जुना प्रघात आहे. तरुण मुली त्वचा गोरी करण्यासाठी तर स्वयंपाकघरात बायका पदार्थाची रुची आणि रंग वाढवण्यासाठी हळद वापरतात. देवळात आणि देव्हाऱ्यात तिची महती काय सांगावी. पण याच आपल्या हळदीचं पेटंट मात्र पहिल्यांदा दुसऱ्याची हाती पडलं.

काळय़ा मुसळीचं फूल

‘येऊर’चं जंगल हे चिरतरुण जंगल आहे. एक पाऊस पडला आणि ते वनचैतन्याने सळसळायला लागलं. अक्षरश: या जंगलाने कात टाकली. उन्हाळ्यात या जंगलातल्या पांगारा, काटे-सावर, साग, ऐन, कौशी अशा प्रकारच्या झाडांनी स्वत:ची पाने गाळली होती. बिनपानाच्या पांगारा आणि काटे-सावरीचे काटे जरा जास्तच अंगावर येत होते. पण या जंगलातली सर्वच झाडे काही पानझडीची नाहीत. इतर अनेक झाडे ज्यांना वर्षभर पाने असतात, जी सदाहरित असतात अशी झाडे तुलनेने बरीच असल्याने ‘येऊर’चं जंगल कधी भकास वाटत नाही. सर्व जंगल दाट-हिरव्या पानांनी भरलेलं असतं तेव्हा पक्षी असूनही दिसत नाहीत. त्यांचे आवाज कानावर पडतात, त्यांची पळापळ जाणवते. पण प्रत्यक्षात पक्ष्यांचं दर्शन होत नाही. याउलट जेव्हा पानगळ होते तेव्हा बिनपानाच्या झाडावर बसलेले पक्षी आणि त्यांच्या हालचाली स्पष्ट दिसतात. हे जंगल अशा पानगळीच्या आणि सदाहरित अशा झाडांच्या समन्वयाने तयार झाल्यामुळे, इथली जैवविविधता आपल्या कल्पनेपलीकडची आहे. ती लपून न राहता नजरेस पडते.

रानटी वनस्पती

पल्या आसपासच्या जंगलात आणि परिसरातसुद्धा अनेक रानटी वनस्पती पावसाळ्यात उगवलेल्या दिसतात. ज्या जागी काल-परवापर्यंत काहीही उगवलेलं नव्हतं त्या जागा पावसानंतर लगेचच हिरव्या झालेल्या दिसतात. त्यात काही हर्वज् असतात तशा वेलीही असतात. भिंतीतल्या दोन दगडांच्या सांध्रीमधल्या मातीतून डोकावणारे नेचेसुद्धा खूप लोभस दिसतात. एरवी बिनफुलांच्या या नेच्यांकडे आपले फारसे लक्ष जात नाही. कधी कधी या जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नेचे गायब होतात. कधी कधी या भिंतीची डागडुजी केली जाते तेव्हा दोन दगडांमध्ये सिमेंट भरले जाते, तेव्हा सिमेंटने भरलेला भाग बिननेचाचा दिसतो, मात्र ज्या सांध्रींमध्ये माती अजून शिल्लक आहे असा भाग नेच्यांनी भरगच्च झालेला दिसतो. या काँक्रीटीकरणात पावसाळ्यानंतर उगवणारे हे छोटे छोटे सौंदर्याचे तुकडे दिवसागणिक हरवून जात आहेत.

अळूचे फूल

आपल्यापकी अनेक जणांना अळूची भाजी आवडत असेल. विशेषत: आपल्याकडील बहुतेक लग्न समारंभांत ही भाजी आवर्जून केली जाते; पण तुम्ही याचे झाड व त्यास येणारा फुलोरा पाहिला आहे का?

अनेकांनी अळूची पाने निश्चितच पाहिली असतील; परंतु त्याचा फुलोरा मात्र बघितला असेलच असे नाही. आज या फुलोऱ्याची गंमत आपण पाहूयात. तुम्हाला असा फुलोरा बघायला मिळाल्यास त्याचे उत्तम निरीक्षण करा व तो तुमच्या मित्रमैत्रिणींनाही दाखवा.

‘पेव’ फुटायला लागले!

ठाणे शहराचं वैभव असणाऱ्या ‘येऊर’च्या जंगलातला जैवविविधतेचा साठा संपता न संपणारा. सध्या ‘येऊर’च्या जंगलात ‘पेव’ फुटायला सुरुवात झाली आहे. ‘पेवा’ला जास्त आणि डायरेक्ट अंगावर येणाऱ्या सूर्यप्रकाशाची गरज नसते. म्हणून मोठय़ा झाडाखाली योग्य अशी सावलीची जागा बघून हे पेव बघता बघता वाढत जातं. ‘पेव’ दिसायला अगदी छोटं, कमरेएवढं वाढणारं असलं तरी हर्ब (herb) या प्रकारात न मोडता झुडूप (shrub) या प्रकारात सामावते. हर्ब आणि श्रब यात हाच मुख्य फरक आहे की, हर्बचा बुंधा हिरवा, मांसल असतो, तर श्रबचा लाकडी. पेव इतरांपासून थोडं निराळंच आहे. त्याचा बुंधा अगदी सुरुवात होते तिथे लाकडी असतो. थोडा उंच झाल्यावर मात्र हर्बसारखा मांसल, मऊ आणि हिरवा लागतो. १५ ते ३० सें.मी.ची कर्दळीसारखी मोठी पानं ‘ससाईल’ म्हणजे बिनदेठाची असतात. देठावर लाल खूण असते. गोलाकार. जिन्याच्या पायऱ्यांसारखी पानांची मांडणी असते. खरं तर निसर्गातील ही गोलाकार म्हणजे चक्राकार पानांची मांडणी पाहून चक्राकार जिन्याची कल्पना सुचली असावी.

सौंदर्याची ‘कपबशी’

सध्या येऊरच्या जंगलात ‘कप अँड सॉसर’ म्हणजे ‘कपबशी’ असं गमतीशीर नाव असणारे झुडूप फुललं आहे. पुरुषभर उंची असणाऱ्या या झुडपाला लागलेल्या कपबशा पाहण्यासारख्या आहेत. या झुडपाच्या फांद्या सर्वागांनी पसरलेल्या असतात आणि त्यांच्या सर्वागात पांढरा चिक असतो. पान पुढे गोलाकार असून एक आड एक असतात. ती वरून हिरवीगार दिसत असली तरी पाठीमागच्या बाजूला त्यांना निळी झाक असते. पसरलेल्या हिरव्या गोलाकार पानांच्या देठाच्या वर आलेले फुलांचे नाजूक देठ आणि त्यावरती हिरवी बशी. या थोडय़ाशा खोलगट पण पसरट बशीच्या बरोबर मध्यभागी गोलाकार लालसर रंगाच्या डेमच्या आकाराचा कप असतो. एकेका फांदीवर ओळीने मांडलेल्या कपबशा फारच मजेशीर दिसतात.

आठवणीतला आसमंत

अजूनही सागरगोटे हा शब्द प्रचलित आहे पण तो प्रकारच माहीत नाही अशी अस्वस्था बघायला मिळते. ‘बिट्टी’च्या झाडाच्या बिया म्हणजेच सागरगोटे’. बिट्टीचं झाड म्हणजेच आपल्या पांढऱ्या कण्हेरीच्या ऐपोसायनेसी कुटुंबातलं सदस्य असलेलं ‘यलो ओलीएॅडर’ असं इंग्रजी नाव असलेलं झाड आहे. गेल्या काही पिढय़ांच्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेलं हे झाड भारतातलं नाही बरं का! दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडिज या झाडाचं माहेर आहे. इंग्लंडमध्ये ‘एक्साइल ट्री’ किंवा ‘ट्रम्टपेट फ्लॉवर ट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झाडाचं वनस्पतिशास्त्रातलं नाव थेवेशिया पेरुव्हियाना. या नावात पण गंमत आहे. फ्रान्समध्ये आन्द्रे थेवेट नावाचे एक धर्मगुरू होते. या धर्मगुरूंच्या नावावरून थेवेशिया या झाडाचं हे जातिनाम तयार झालंय, नि पेरू देशात हे झाड पहिल्यांदा शोधलं गेलं म्हणून पेरुव्हियाना हे नाव. आहे ना मनोरंजक?

रंगोत्सव

आपण आपल्याच घाईगडबडीत असतो. आसपास बहरलेला निसर्ग आपल्या गावीही नसतो. सध्या बहरलेली शाल्मली आणि कांचनाची झाडं जरा थांबून, निरखून पहाल तर निसर्गाचा फुलोत्सव, रंगोत्सव बघून हरखून जाल.

आपण पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली की निसर्गाकडे पाहायची आपली नजरच जणू बदलून जाते. वेगवेगळे पक्षी, त्यांच्या निवासाच्या जागा, त्यांचं खाणं नि त्या खाण्याची उपलब्धता, पक्ष्यांची वाढती किंवा घटती संख्या याच्या जोडीला निसर्गात होणारे बदल या सगळ्याचा कळत-नकळत विचार सुरू झालेला असतो. निसर्गातल्या संक्रमण काळात होणारे बदल आपण किती तत्परतेने पाहत असतो, टिपत असतो हे स्वतलाच विचारणं गरजेचं आहे. दररोजची प्रभातफेरी किंवा संध्याकाळी चालायला बाहेर पडल्यावर, एखाद्या सुट्टीच्या दिवशी जवळच्या उद्यानात, टेकडीवर, जंगलात चौकस नजरेने पाहिलं तर निसर्गात होत असलेले बदल सहज जाणवतात. हल्ली बहुतेक मोबाइल्स उत्तम फोटो काढू शकतात. त्याचा उपयोग केल्यास, लहानशी नोंदवही नि पेन जवळ बाळगल्यास निसर्गनिरीक्षण करण्याची नि टिपणं काढण्याची उत्तम सवय लागते. अपरिचित झाड, अनोळखी किडा, नवीन पक्षी जाणून घेतल्यावर होणारा आनंद काही औरच असतो.

निसर्गातला प्रेमोत्सव

शिशिरातली पानगळ संपायला लागली की निसर्गाला वेध लागतात ते प्रेमोत्सवाचे. अंगावर लाल लेणं मिरवणारा पांगारा आणि प्रेमाचा आदर्श असलेला सारस पक्षी या उत्सवाचेच प्रतीक आहेत.

नुकत्याच केलेल्या जंगल निसर्ग भ्रमंतीनंतर सहजच इंदिरा संतांची पानगळ कविता आठवली. किती सहजसुंदरपणे इंदिराबाईंनी जात्या शिशिराचं वर्णन केलंय. ‘आला शिशीर संपत पानगळ सरली, ऋतुराजाची चाहुल झाडावेलींना लागली..’. अगदी खरंय. जागोजागी करडय़ा शुष्क रंगाची जाणीव तीव्र होत असतानाच काटेसावर आणि पळसाने उधळलेला लाल रंग निसर्गात येऊ घातलेल्या प्रेमोत्सवाचेच प्रतीक वाटावं. जसे आपले न्यू इयर सेलिब्रेशन्सचे फंडे बहुचर्चित असतात, तसेच फेब्रुवारीतल्या सेंट व्हॅलेंटाईन डे या प्रेमदिवसाचे फंडे बहुचर्चित असतात. आपल्याकडे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा जणू प्रेममय होऊन गेलेला असतो. निसर्गातसुद्धा येऊ घातलेल्या वसंताची चाहूल लागलेली असतेच. लाल काटेसावर नि गुलाबी कांचन पूर्ण फुलून जणू काही वसंताच्या आगमनाला तयारच असतात.

वसंतसमये प्राप्ते

शिशिराने विरक्त करून टाकलेल्या सृष्टीला ज्या सृजनकाळाची आस लागलेली तो काळ, अर्थात वसंत ऋतू. तो सुरू झाल्याची द्वाही आसमंतात फिरायला सुरुवात झाली आहे.

मागच्या आठवडय़ात जंगलवारी करून येत असताना, गाडीच्या ड्रायव्हरने मराठी गाणी लावली होती. बरीचशी अनोळखी नि कंटाळवाणी गाणी ऐकून झाल्यावर अचानक, ‘हृदयी वसंत फुलताना’ अशी परिचित गाण्याची ओळ कानावर आली. ती ऐकल्यावर पटकन हसू आलं. सध्याच्या आसमंताला हे गाणं अगदी चपखल लागू होत होतं, असं पटकन वाटून गेलं. आपल्या दैनंदिन धावपळीत हळुवार कूस पालटणारे ऋतू आपण पाहून न पाहिल्यासारखं करत असतो. मात्र काही ऋतू असे असतात की, त्यांचं आगमन अगदी हवंहवंसं वाटतं कारण त्या काळात निसर्ग अगदी भरभरून संपदा उधळत असतो. शिशिराने विरक्त करून टाकलेल्या सृष्टीला ज्या सर्जनकाळाची आस लागलेली तो काळ, अर्थात वसंत सुरू झाल्याची द्वाही आसमंतात फिरायला सुरुवात झालेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वसंत पंचमीने वसंताच्या आगमनावर शिक्कामोर्तब केलेलं आहेच. भारतीय ऋतुचक्राप्रमाणे आपल्याकडे शिशिर हा शेवटचा ऋतू तर वसंत पहिला ऋतू समजला जातो. म्हणजेच निसर्गाचं नववर्ष सुरू झालं.

कुंडीतले कंद

कोशिंबिरीसाठी गाजर-मुळा-बीट आणि आलं ओली हळद सगळं घरच्या घरी पिकवता येईल.

रोजच्या जेवणात गाजर, मुळा, बीट यांचं सॅलड किंवा कोशिंबीर असली की, जेवणाची लज्जत वाढतेच. गाजर, मुळा, बीट यामुळे आपलं जेवणाचं ताट बहुरंगी आणि बहुगुणी होतं. आहारात कंदवर्गीय भाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कंदवर्गीय भाज्यांमधील अनेक जीवनसत्त्वं आपल्या आहाराला परिपूर्ण बनवतात. गाजर, मुळा, बीट यासोबतच आपल्या रोजच्या जेवणाची आणि चहाची चव वाढवणारे आले, उपासाला हमखास लागणारी रताळी आणि वर्षातून एकदा करायच्या लोणच्यासाठीची ओली हळद या कंदवर्गीय वनस्पतींची लागवड आपण आपल्या हिरव्या कोपऱ्यात सहजपणो करू शकतो.

माझ्या काही मित्रंनी या कंदवर्गीय वनस्पतींची लागवड करण्याचा प्रयत्न केला पण फक्त रताळय़ाचा वेल खूप छान वाढला बाकी सगळ्या कंदवर्गीय वनस्पतींच्या लागवडीत मात्र त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. या कंदवर्गीय भाज्या लावण्याचं आणि वाढवण्याचं एक विशिष्ट तंत्र आहे. ते सांभाळल्याशिवाय या कंदवर्गीय भाज्या फुलत, फळत नाहीत. आपल्या हिरव्या कोप:यात कंदवर्गीय वनस्पती वाढवताना कुंडय़ांची निवड, मातीचं आरोग्य, लागवडीची काळजी आणि कुंडीतील मातीतल्या खताची मात्र सांभाळली तर गाजर, मुळा, बीट, रताळे आपल्या बागेतही हसत-खेळत वाढतील!

पाणी जपण्याची गोष्ट

पाण्याची आवश्यकता सर्वच क्षेत्रात जाणवत असताना त्या पाण्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतुहूल असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तरीदेखील पाण्याविषयी शास्त्रीय माहिती समाजात अभावानेच आढळते. पाणीसाठी वेगाने नष्ट होत असताना गरज आहे ती पाणीवापराबद्दलच्या प्रशिक्षणाची!

विज्ञान म्हणजे काहीतरी कठीण किंवा किचकट असते अशी अनेकांची शाळेतच समजूत झालेली असते. त्याचे कारण त्या विषयात फारसा रस निर्माण होऊ शकला नाही हेच असते. तो रस का निर्माण झाला नाही याची कारणे विविध असू शकतात. कदाचित आकलन ठीक झाले नसेल, पुस्तके उपलब्ध नसतील किंवा वर्गात विषय नीट शिकविला जात नसेल! पण म्हणून विज्ञान कधीच समजणार नाही असे मात्र अजिबात नसते. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वय कधीच आडवे येत नाही. इच्छाशक्ती असेल तर आपण कोणत्याही वयात शिकू शकतो.

आता साध्या पाण्याचाच विषय घ्या. पाण्याला जीवन असे म्हटले जाते. म्हणजे पाणी जीवनासाठी आवश्यक असते हा त्याचा एक अर्थ झाला. पिण्यासाठी आपल्याला पाणी लागते. शरीर शुद्धीसाठी, आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी लागते. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी, मग ती जलऊर्जा असो किंवा औष्णिक वा अणुऊर्जा असो, त्यासाठी पाणी हेच माध्यम असते.

गॅलरीतली बाग

नैसर्गिक स्रोतांच्या मर्यादा आणि त्यांचे वाढत्या लोकसंख्येच्या गरजांशी असलेले व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन अन्नधान्य व जीवनोपयोगी विविध वस्तूंची उत्पादने वाढविण्यासाठी विविध संशोधन संस्था, विद्यापीठे, प्रगतीशील शेतकरी, उद्योजक कार्यरत असतातच. पण दैनंदिन जीवनात आपली अन्नधान्याची गरज छोट्या प्रमाणात का होईना आपण भागवू शकतो.

दशपर्णी अर्क कसा तयार करावा - व्हिडीओ

दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रक्रिया.
भाषा: मराठी

जीवामृत कसे तयार करावे - व्हिडीओ

भाषा: मराठी

छतावरील पाण्याचे संकलन

छतावर पडून वाया जाणारे पाणी बोअरवेलमध्ये साठविण्याचा उपक्रम अनेक शहरांमध्ये सुरू झालेला आहे. काही नगरपालिकांनी असे पाणी साठवणार्‍यांना घरङ्गाळ्यामध्ये काही प्रमाणात सूट सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे. या पद्धतीमध्ये घराच्या छतावर पडून वाहून ओढ्याला किंवा नदीला मिळणारे पाणी हापशामध्ये किंवा बोअरवेलमध्ये जिरवले जाते. त्यामुळे वाया जाणार्‍या पाण्याच्या साह्याने बोअरवेलमधील पाण्याची पातळी वर येते. हा प्रयोग अनेकांनी केलेला आहे. प्रयोग करण्यापूर्वी त्यांच्या हापशाला असलेले पाणी खोल गेलेले होते. ५०-६० वेळा हापसल्यानंतर पाणी वर यायला सुरुवात होत असे. परंतु बोअरवेलमध्ये पाणी अशा पद्धतीने जिरवले, त्यामुळे पाण्याची पातळी वर आली आणि १०-१२ वेळा हापसताच हापशातून पाणी वर आले. याचा अर्थ पाण्याची पातळी वर आली असाच होतो. हा एवढा चांगला अनुभव असेल तर खरोखर आपण आजपर्यंत करोडो गॅलन पाणी वाया घालवलेले आहे हे आपल्या लक्षात येईल. यासाठी करावयाची पद्धत सुद्धा साधारणपणे विहीर पुनर्भरणाच्या पद्धतीसारखीच आहे. मात्र त्यासाठी फार मोठा गाळण खड्डा घ्यावा लागत नाही.

गांडूळ खत कसे तयार करावे ?

आपण कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत पाहिलेली आहे. आता सर्वत्र चर्चेला असलेले गांडूळ खत म्हणजे काय आणि ते कसे करावे हे बघणार आहोत. गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड तयार करण्याचा सल्ला दिला जात असतो. ज्यांच्याकडे शेड घालण्यासाठी खर्च करण्याची ऐपत असेल त्यांनी पत्र्याचे किंवा तसले मजबूत शेड तयार करायला काही हरकत नाही. परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड आवश्यक नाही. गांडुळाला उन्हापासून त्रास होतो म्हणून त्याला सावली पाहिजे आहे. ती छपराने सुद्धा देता येते. साधे कुडाचे शेड जरी केले तरी गांडूळ खत तयार करण्यात काही अडचण येत नाही. या छपराखाली आपल्या गरजेनुसार एक मोठा गादी वाङ्गा करावा आणि त्यात गांडूळ सोडून द्यावेत. या गांडुळांना खायला काही तरी देत रहावे. म्हणजे त्या वाफ्यावरच त्या खाल्लेल्या वस्तूपासून ती गांडुळे खत तयार करत राहतील. हेच गांडूळ खत होय. या वाफ्यावर पाचट किंवा गव्हाचे काड असे आच्छादन टाकावे. म्हणजे गांडुळाला उन्हापासून आणखी संरक्षण मिळेल. या वाफ्यावरच्या गांडुळाला खायला काय दिले पाहिजे ? आपल्या शेतातल्या खताच्या खड्ड्यातील ७० टक्के पर्यंत कुजलेला कचरा त्याला दिला तरी चालतो. किंवा त्याला खायला सोपा जाईल असा हलका सेंद्रीय कचरा दिला तरी ते तो कचरा खाऊ शकते.