बीजामृत व जीवामृत

बीजामृत

बीजामृताच्या बीजप्रक्रियेमुळे उगवणशक्ती वाढते तसेच तुटवातीची वाढ जोमदार होते.

साहित्य: २० लिटर पाणी, १ किलो देशी गाईचे शेण, १ लिटर गोमूत्र, १०० मिली दूध, जिवाणू माती मूठभर व ५० ग्रॅम चुना.

अमृत पाणी:
साहित्य: पावशेर देशी गाईचे तूप, १० किलो शेण, अर्धा किलो मध, २०० लिटर पाणी.

कंपोस्ट

नाडेफ कंपोस्ट

टाकी बांधण्याची पद्धत:
पाणी न साचणारी उंच ठिकाणाची व सावली असणारी जागा निवडावी. टाकीचे बांधकाम शक्यतो भाजक्या विटांमध्ये ९ इंच जाडीचे करावे. टाकीचा आकार १५ फूट लांब, ५ फूट रुंद व ३.५ फूट उंच असावा. बांधकाम करताना टाकीचा तळाचा भाग कठीण स्वरूपाचा करून घ्यावा. वीट बांधकामाच्या प्रत्येक थरानंतर तिसर्‍या थरामध्ये खिडक्या ठेवा. खिडक्यांची रचना तिरकस रेषेत चारी बाजूंना येईल असे पहावे.
नाडेफ भरण्यासाठी लागणारी सामग्री : –
१) १५ टन काडी कचरा, पालापाचोळा, घसकटे इ.
२) ८ ते १० पाट्या शेणखत व १ गाडी माती.
३) ४ ते ५ बॅटल पाणी.
४) जनावराचे मूत्र उपलब्धतेनुसार.

हिरवळीची खते

दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खताची उपलब्धता व पर्यायाने जमीनीची सुपीकता कमी होत चालली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी हिरवळीची पिके घेऊन फुलोर्‍यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळून जमिनीचा पोत सुधारतो व सुपीकता वाढते.

जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास सेंद्रिय कर्बाची अत्यंत आवश्यकता असते; परंतु भारत हा उष्ण प्रदेश असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे ऑक्सिटेशन खूप झपाट्याने होते व सेंद्रिय कर्बाची नेहमीच कमतरता भासते.
सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जमिनीत वाढल्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या जिवाणूंची संख्या खूप वाढते. तसेच सेंद्रिय पदार्थ मातीच्या लहान लहान कणांना एकत्र सांधून ठेवतो. हलक्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

दशपर्णी अर्क (दहा पानांचा अर्क)

सगळ्या प्रकारच्या किडी, पहिल्या अवस्थेतील अळ्या व ३४ प्रकारच्या बुरशी यांचे नियंत्रण दशपर्णी अर्क करते.

दशपर्णी अर्क कसा करावा
१) कडुनिबांचा पाला – ५ किलो
२) घाणेरी (टणटणी) पाला – २ किलो
३) निरगुडी पाला – २ किलो
४) पपई पाला – २ किलो
५) गुळवेल/पांढरा धोतरा पाला – २ किलो
६) रुई पाला – २ किलो
७) लाल कण्हेर पाला – २ किलो
८) वण एरंड पाला – २ किलो
९) करंज पाला – २ किलो
१०) सीताफळ पाला – २ किलो

निंबोळी अर्क

५ टक्के निंबोळी अर्क तार करण्याची सोपी पद्धत:

उन्हाळ्यात (पावसाच्या सुरुवातीस) निंबोळ्या उपलब्ध असताना त्या जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात व साठवण करावी. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढ्या बारीक कराव्यात. पाच किलो चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबण्याचा चुरा वेगळा भिजत ठेवावा. दुसर्‍या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. त्या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे. वरीलप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा.